Maharashtra Politics| शिंदे सरकारचे आज भवितव्य ठरणार, पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ करणार सुनावणी

६ सप्टेंबरला शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली. नोव्हेंबरमध्ये निवडणूका होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देऊ नये अशी मागणी केली.
Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme Court
Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme CourtSaam Tv
Published On

मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडणार आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाती स्थापना केली आहे. आज या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या घटनापीठ समितीमध्ये धनंजय चंद्रचूड, न्या.एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या.हिमाकोहली, न्या. पी नरसिंहा यांचा समावेश आहे. तर सरन्यायाधीश उदय लळीत यांचा घटनापीठात समावेश नाही.

Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme Court
मोठी बातमी ! दसरा मेळाव्यात Cm शिंदे उद्धव ठाकरेंना देणार आणखी माेठा धक्का; आखला मास्टर प्लॅन

दरम्यान शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देऊ नये अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. यासाठी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकींचे कारण देण्यात आले आहे. निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी पक्ष आणि चिन्ह कोणाचे हे ठरवण्याची गरज असल्याचं म्हणणं शिंदे गटाने रिट याचिकेत म्हटले. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक (Election) आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह आणि शिवसेना नाव संदर्भात निर्णय घेऊ शकेल का या मुद्द्यांवर आज सुनावणी होणार आहे.

Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme Court
Umesh Katti: कर्नाटकचे मंत्री उमेश कट्टी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 'हे' मोठं स्वप्न राहिलं अपूर्ण

निवडणूक आयोगाच्या कारवाई संदर्भात आत्तापर्यंत काय घडलं?

६ सप्टेंबरला शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली. नोव्हेंबरमध्ये निवडणूका होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देऊ नये अशी मागणी केली.

२३ ऑगस्टला ठाकरे गटाने आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितली होती. ही मुदत संपत असताना २३ ऑगस्टच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने जोपर्यंत घटनापिठाची पुढील सुनावणी होत नाही. तोपर्यंत निवडणूक आयोगाची कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते.

२३ ऑगस्टला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं होतं.

त्यानंतर २५ ऑगस्टला सुनावणी होणार होती पण झाली नाही.

दरम्यान त्या अगोदर ११ ऑगस्टला निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला ४ आठवड्याची पूर्ण वेळ द्यायला नकार दिला होता

उत्तरासाठी अवघ्या 15 दिवसांची मुदत ठाकरे गटाला दिली होती

त्यामुळं ठाकरे गटाला 23ऑगस्टपर्यंत उत्तर देणं भाग होतं. उद्धव ठाकरे गटाने 4 आठवड्यांचा वेळ मागितला होता आयोगाने ठाकरे गटाला 15 दिवसांचा कालावधी दिला होता

२३ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी पर्यंत कारवाईला स्थगिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com