Kalyan News : भाषेमुळे ९ महिने बाप लेकाची ताटातुट; कल्याण रेल्वे स्थानकावर काढले अत्यंत हलाखीच्या परिस्थित दिवस

Indian Railway : कल्याण आरपीएफ अधिकाऱ्याची सतर्कतेमुळे 9 महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मुलाची वडिलांशी भेट झाली आहे. हा तरुण हिमाचल प्रदेशमधून बिहारला जाताना भरकटला आणि कल्याणमध्ये पोहोचला होता.
Kalyan News
Kalyan News Saam Digital

अभिजित देशमुख

अर्जुनकुमार, 19 वर्षीय तरुण हिमाचल प्रदेशातून बिहारकडे जात असताना भरकटला आणि थेट कल्याणला पोहचला. मानसिक स्थिती ठिक नसल्याने त्याला काहीच सांगता येत नव्हतं. गेल्या अनेक महिन्यांपासून तो कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अत्यंत हलाखीच्या अवस्थेत राहत होता. काही नागरिकांनी याची माहिती कल्याण आरपीएफला दिली. तरुणाला कल्याण आरपीएफने ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली मात्र त्याची भाषा समजत नव्हती. अखेर ही भाषा बिहार येथील मगई बोली भाषा असल्याचे आरपीएफच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तपासाची सूत्र हलवली त्यांच्या वडिलांचा ठाव ठिकाणा शोधून काढलं आणि बापलेकाची भेट घडवून आणली.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एक तरुण मळकट फाटलेल्या कपड्यात फिरत होता. कधी कुणालाडून पैसे,कधी जेवण कधी पाणी मागत पोटाची खळगी भरत होता . रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या काही जणांची नजर या तरुणावर पडली ते त्याला मदत करायचे .त्यांनी आरपीएफच्या वरिष्ठ अधिकारी रिषी शुक्ला यांना त्याचा फोटा पाठविला. शुक्ला यांनी हा फोटो कल्याण आरपीएफचे इन्चार्ज राकेश कुमार यांना पाठविला.

राकेश कुमार यांनी या तरुणाला शोधून आरपीएफ कार्यालयात आणले. राकेश कुमार यांनी या तरुणाची चौकशी केली मात्र तो फक्त त्याचं नाव सांगू शकत होता. त्याच्या बोली भाषेवरून राकेश कुमार यांनी त्याची भाषा ओळखले बिहार मधील पटना शहराच्या आजूबाजूला ही भाषा बोलली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानंतर राकेश कुमार यांनी या भागात ही भाषा बोलली जाते त्या भागातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधला या तरुणाचा फोटो पाठवले. राकेश कुमार यांना बिहारमधील दुल्हीन ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात राहणारा गनौरी माेची याचा हा मुलगा असल्याची माहिती राकेश कुमार यांना मिळाली.

Kalyan News
Pune Airport : पुणे विमानतळावर सोने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

अर्जुन कुमार असे या तरुणाचं नाव असून त्याची मानस्थिक स्थिती ठिक नव्हती. गनौरी हा हिमाचल प्रदेशला एका मोठ्या कंपनीत गार्डचे काम करतो. राकेश कुमार याने हिमाचलमध्ये राहणाऱ्या गनौरी मोची यांना संपर्क साधला. गनौरी हा गेल्या नऊ महिन्यांपासून आपल्या मुलाला शोधत होता. मुलगा सापडल्याची माहिती मिळतात गणोरी यांनी थेट कल्याण गाठले आपल्या मुलाला पाहून त्याना अश्रू अनावर झाले. अर्जुन कुमार हा त्याचे पिता गनौरी यांच्यासोबत हिमाचलप्रदेश येथे राहत होता . अर्जुन याने मी गावी बिहार येथे जातो व शेती करतो असे वडिलांना सांगितले व तो घरातून निघाला मात्र त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तो प्रवासात भरकटला व बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. मुलगा सापडल्याने त्यांनी आरपीएफचे आभार मानले.

Kalyan News
Powai News: पवईमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान दगडफेक, ५ पोलिस जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com