Kalyan News : डोबिंवलीनंतर कल्याणमध्ये पुन्हा एक बेकायदेशीर इमारत प्रकरण उघड, 26 कुटुंबांचा संसार रस्त्यावर

KDMC News : कल्याण-डोंबिवलीमध्ये ६५ अनधिकृत इमारतीचा मुद्दा चर्चेत आहे. अशात कल्याणमधली आणखी एक इमारत बेकायदेशीर असल्याचे सांगून तेथे कारवाई करण्यात आली आहे. यामुळे इमारतीमधील २६ कुटुंब बेघर झाली आहेत.
Kalyan illegal building news
Kalyan illegal building newsSaam Tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याण-डोबिंवली परिसरात ६५ बेकायदा इमारत प्रकरणामुळे अनधिकृत बांधकामे आणि बांधकामांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ६५ अनधिकृत इमारतींचे प्रकरण ताजे असतानाच महापालिकेने कल्याणमध्ये आणखी एका अनधिकृत इमारतीवर कारवाई केली आहे. कारवाईपूर्वी इमारत बेकायदेशीर असल्याची कल्पना रहिवाशांना नव्हती. महापालिकेच्या कारवाईमुळे २६ कुटुंब बेघर झाली आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरातील वक्रतुंड या इमारतीवर कारवाई केली आहे. कारवाई होण्यापूर्वी ही इमारत अनधिकृत आहे याची माहिती तेथील रहिवाशांना नव्हती. या कारवाईमुळे २६ कुटुंबांच्या संसार रस्त्यावर आले आहेत. याप्रकरणी रहिवाशांनी इमारतीच्या जागेचे मालक सुभाष म्हात्रे, बिल्डर अभिषेक तिवारी आणि राजेशकुमार शर्मा यांच्या विरोधात १ कोटी ८ लाख ९१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेकडील वक्रतुंड इमारतीची जागा ही जानेवारी २०१७ साली अनधिकृत असल्याचे घोषित करण्यात आले होते. या जागेचा न्यायालयात वाद सुरु असतानाही तेथील इमारतीमधील घरांची २०१७ ते २०२३ दरम्यान विक्री करण्यात आली. या इमारतीतल्या सोसायटीचे, तेथील घरांचे रजिस्ट्रेशन झाले. यादरम्यान महापालिकेसह बिल्डर, जागा मालक कोणीही आम्हाला घरे अनधिकृत असल्याची कल्पना दिली नसल्याचे रहिवाशांनी म्हटले आहे.

Kalyan illegal building news
Pune Crime : शिवशाहीत बलात्कार करणारा हाच तो दत्ता गाडे, फोटो आला समोर

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे महारेरा प्रमाणपत्र मिळवून रहिवाशांची कोट्यवधींची फसवणूक करण्याचा प्रकार सुरु आहे. अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने रहिवाशांची मधल्यामध्ये फरफट होत आहे. फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात रहिवाशी आक्रमक झाले आहेत.

Kalyan illegal building news
Dattatray Gade : पुण्यात तरुणीवर अत्याचार, प्रकरण तापलं; शिरुरमधल्या दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांचे ८ पथक रवाना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com