Blast in Kalyan: कल्याणमध्ये स्फोट; काही भागात घरांना बसले हादरे, नागरिक भयभीत

Blast in NRC Building in Kalyan: कल्याण-मोहने आंबिवली परिसरातील एनआरसी कॉलनी काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा तीव्रता इतकी मोठा होता की, मोहने,आंबिवली, तिपन्नानगर, एनआरसी कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांना हादरे बसले.
Kalyan News: Blast in NRC Building in Kalyan
Kalyan News: Blast in NRC Building in KalyanSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Latest News:

कल्याण-मोहने आंबिवली परिसरातील एनआरसी कॉलनी काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा तीव्रता इतकी मोठा होता की, मोहने,आंबिवली, तिपन्नानगर, एनआरसी कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांना हादरे बसले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले. या भागात स्फोट करणाऱ्या विकासकाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी केली आहे. नागरिकांच्या जिवीताला धोका असल्याने स्फोट थांबविले नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

Kalyan News: Blast in NRC Building in Kalyan
Kalyan Crime News: गाडीला चावी पाहिली, चोरीचा मोह झाला अन् फसला; महागड्या गाड्या चोरणारा सराईत चोरटा गजाआड

कल्याणमधील एनआरसी कंपनीच्या जागेत लॉजिस्टिक पार्क उभारले जात आहे. त्याकरिता हे स्फोट केले जात आहेत. या स्फोटासाठी लागणारी परवानगी सरकारी यंत्रणांकडून घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

कल्याणच्या एनआरसी कॉलनी परिसरात काल सायंकाळी सात वाजता मोठा स्फोट झाला. त्यामुळे नागरिकांच्या घरांना हादरे बसले. नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आले. या प्रकरणी नागरिकांनी शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे हा प्रकार सांगितला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या स्फोटानंतर माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. माजी नगरसेवक पाटील यांनी आरोप केला आहे की, एनआरसी कंपनीची जागा लिलावात अदानी उद्योग समूहाने घेतली आहे. या उद्योग समूहाकडून त्या ठिकाणी विकासाचे काम सुरु आहे. त्यासाठी हे स्फोट केले जातात.त्यामुळे नागरिकांचा जिवीतास धोका निर्माण झाला आहे.

Kalyan News: Blast in NRC Building in Kalyan
kalyan Dombivli : कल्याण डोंबिवली महापालिकेचा गलथान कारभार; लाभार्थ्यांना चाव्या मिळूनही घराचे स्वप्न अपूर्णच, कारण काय?

नागरिक भयभीत झाले आहे. महापालिकेने एनआरसी कॉलनीतील घरे धोकादायक असल्याचे सांगितले. ती घरे पाडली जात आहेत. त्यात कामगारांची थकीत देणी एनआरसीकडून मिळालेली नाही. थकीत देण्याचा विषय न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थितीत विकासकाने ब्लास्टिंग करीत आहे. ब्लास्टींग बेकायदेशीर असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.

नागरिकांचं काय म्हणणं आहे?

या परिसरातील नागरिकांनी सांगितले की, महापालिकेने एनआरसी कॉलनीतील घरांना नोटिसा लावल्या. घरे धोकादायक असल्याचे सांगितले. त्या नोटिसमध्ये अदानी यांनी पर्यायी घरे द्यावीत, असे म्हटले होते. त्यांच्याकडून पर्यायी घरांची व्यवस्था न करता त्यांना वाटेला लावण्याचा प्रकार केला आहे. ज्या घरात नागरिक राहत आहेत. त्यांना या ब्लास्टिंगचा हादरा बसल्याने ते नागरिक घाबरले आहेत. हे प्रकार थांबविले गेले नाहीत, तर नागरिक रास्ता रोको आणि प्रसंगी रेल रोको आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com