Kalyan : उमेदवारीसाठी काही पण! १० दिवसात २ वेळा झेंडा बदलला, शिवसेनेत तिकिट मिळेना म्हणून तुतारी हातात

Kalyan Dombivli Civic Polls 2025-2026 : कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी एका इच्छुक उमेदवाराने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करून अर्ज भरल्यामुळे चर्चेची लाट पसरली आहे. दहा दिवसांत दोन वेळा पक्ष बदलल्यावर निष्ठा आणि राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
Kalyan : उमेदवारीसाठी काही पण! १० दिवसात २ वेळा झेंडा बदलला, शिवसेनेत तिकिट मिळेना म्हणून तुतारी हातात
Kalyan Dombivli Muncipal Election 2025-2026Saam Tv
Published On
Summary
  • कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

  • इच्छुक उमेदवाराने दहा दिवसांत दोनदा पक्ष बदलले आणि अर्ज भरला

  • शिवसेना मध्ये तिकीट न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश

  • या पक्षांतरामुळे उमेदवाराच्या निष्ठा आणि राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकींसाठी सध्या धावपळ सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. नेते मंडळी प्रचार सभा, जागावाटप, फॉर्म भरण्यात व्यस्थ आहेत. तर काही पक्षांमध्ये फोडाफोडीचे नाटक सुरुच आहे. दरम्यान आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस असून येत्या १५ जानेवारीला निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. तत्पूर्वी एका उमेदवाराने १० दिवसांत दुसऱ्या पक्षांत प्रवेश केल्याचे वृत्त आहे. महायुती महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी न मिळालेल्या इच्छुक उमेदवारांनी आता पक्ष बदलाची तयारी सुरू केली, तर काहींनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

कल्याणमध्ये एका इच्छुकाने तर कहरच केला. दहा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका सभेत बैल बाजार परिसरातील फैजल जलाल यांनी शिवसेना प्रवेश केला. मात्र तिकीट मिळत नाही, याचा अंदाज आल्यानेच त्यांनी काल चक्क राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यालय गाठले. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे जिल्हाध्यक्ष वंडर पाटील यांचा उपस्थितीत राष्ट्रवादीतील प्रवेश उरकून घेतला. इतकेच नव्हे तर चक्क काही मिनिटात एबी फॉर्म देखील पटकावला.

Kalyan : उमेदवारीसाठी काही पण! १० दिवसात २ वेळा झेंडा बदलला, शिवसेनेत तिकिट मिळेना म्हणून तुतारी हातात
Railway : रेल्वे प्रवासातील गर्दीचा ताण कमी होणार, २०३० पर्यंत ४८ प्रमुख शहरांमध्ये क्षमता दुप्पट करणार; काय म्हणाले रेल्वे मंत्री? वाचा

फैजल जलाल यांच्या या झपाट्याने बदललेल्या भूमिकेमुळे कल्याणमधील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निष्ठा की उमेदवारी? असा सवाल उपस्थित करत अनेकांनी या पक्षांतरावर टीका केली आहे. 10 दिवसांत दोन पक्ष बदलल्याने त्यांची राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा राजकीय जाणकारांकडून केली जात आहे.या घडामोडीमुळे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील राजकीय समीकरणे आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com