Kalyan Crime News: कल्याणमधील समीर लोखंडे हत्या प्रकरणात मोठी कारवाई, भाजप पदाधिकाऱ्याला अटक

Kalyan Sameer Lokhande Case: समीरच्या हत्येप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
Kalyan Crime News, Sameer Lokhande
Kalyan Crime News, Sameer Lokhande SAAM TV
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Crime: कल्याणमध्ये (Kalyan) चार दिवसांपूर्वी १० ते १२ जणांच्या टोळक्यानं एका अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. समीर लोखंडे असं हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव होते. समीरच्या हत्येप्रकरणी (Sameer Lokhande Case) कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काही तरुणांना अटक केली आहे. आता याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. समीरच्या हत्येप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

Kalyan Crime News, Sameer Lokhande
Congress Protest : ...तोपर्यंत संघर्ष सुरुच राहील; कांदाप्रश्नी केंद्रातील भाजप सरकारला काँग्रेसचा 'आरपार'चा इशारा

समीर लोखंडे या मुलाविरोधात देखील पोलिसांत गुन्हे दाखल होते. समीरच्या हत्येप्रकरणी ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. आता समीरच्या हत्येप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्याला अटक केली आहे.

विशेष म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली होती. त्या दिवशी आकाश हा भाजपच्या एका मोर्चात सहभागी होता. दरम्यान घटनेच्या पूर्वी आकाश हा आरोपींच्या संपर्कात होता. मोबाईलच्या सीडीआरमुळे आकाश जैसवालला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप पदाधिकाऱ्याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Kalyan Crime News, Sameer Lokhande
Samruddhi Mahamarg Latest News: वाढत्या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबणार? याचिका दाखल, कोर्ट काय निर्णय घेणार?

जुन्या वादातून कल्याण पूर्वेला राहणाऱ्या काही तरुणांनी लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत समीर लोखंडे या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला होता. ज्या मुलाने अन्य तरुणांच्या मदतीने समीरला मारहाण केली होती तो मुलगा देखील अल्पवयीन आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या समीरवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Kalyan Crime News, Sameer Lokhande
Ganeshotsav 2023: गणेशोत्सवापूर्वीच मुंबईतील रस्ते होणार चकाचक, BMC चा जम्बो प्लान

या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन तरुणांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. पोलीस तपासादरम्यान या प्रकरणात आणखीन काही तरुणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे भाजप युवा मोर्चा सरचिटणीस आकाश जैसवाल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आकाश जैसवाल हा केडीएमसीच्या भाजप माजी उपमहापौर विक्रम तरे यांचा निकटवर्तीय आहे. ज्या दिवशी समीरला मारहाण केली जात होती. तेव्हा आकाश हा भाजपच्या निषेध मोर्चात सहभागी होता. मात्र या प्रकरणातील फिर्यादीने आकाश जैशवाल याचे नाव घेतल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मोबाईल सीडीआरमुळे आकाशचे नाव समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com