Crime News: संतापजनक! कामावरुन घरी परतणाऱ्या तरुणीची छेड काढत मारहाण; मदतीला धावलेल्या २ तरुणांवर जीवघेणा हल्ला

या मारहाणीत तरुणीच्या मदतीला धावलेले दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत...
 Crime News
Crime NewsSaamTv

अभिजित देशमुख...

Kalyan News: कामावरुन घरी परतणाऱ्या तरुणीची छेड काढून तिला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार कल्याणमधील मंगेशी पॅराडाईज परिसरात घडला आहे . इतकेच नव्हेतर या तरुणीच्या मदतीला आलेल्या दोन तरुणांवरही छेड काढणाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला असून त्यांच्यावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून छेड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Latest Marathi News)

 Crime News
Sonia Gandhi: मोठी बातमी! सोनिया गांधींचा ‘मॉर्फ’ व्हिडीओ पोस्ट करणारा पोलिसांच्या अटकेत

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण (Kalyan) पश्चिमेत राहणारी एका 22 वर्षीय तरुणी कामावरुन रात्री घरी परतत होती. या तरुणीला भर रस्त्यात प्रणव कोनकर याने अडवून तिची छेड काढली. तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर दोन तरुण त्या तरुणीच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. याचा राग मनात धरुन प्रणव कोऩकर याने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. या सगळ्य़ांनी मिळून योगशे चौधरी आणि उत्कर्ष सिंग या दोघांना लाकडी दांडके आणि बॅटने बेदम मारहाण केली आहे.

 Crime News
Amit Shah: अमित शाहांचं हैदराबादमध्ये 'निरमा गर्ल'च्या पोस्टरने स्वागत; नारायण राणेंचंही नाव, पोस्टरची देशभर चर्चा

या मारहाणीत योगेश याचे डोके फुटले आहे. तर उत्कर्ष याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या दोघांना रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन खडकपाडा (KhadakPada Police) पोलिसांनी प्रवण कोनकर याच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Crime News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com