Kalyan Case : विशाल गवळीला फाशी द्या, कुणीही राजकारण करू नये; पीडित मुलीच्या वडिलांची आर्त हाक

Kalyan Crime News : कल्याण अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशाल गवळीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. कुणी राजकारण करू नये, असे पीडितेच्या वडिलांनी आवाहन केलं आहे.
विशाल गवळीला फाशी द्या,  कुणीही राजकारण आणू नये; पीडित मुलीच्या वडिलांची आर्त हाक
Kalyan CaseSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

Kalyan Case : कल्याण शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेच्या विरोधात संपूर्ण राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला बुलढाण्यातून अटक केली. या आरोपीवर कडक कारवाईची मागणी होत आहे. या आरोपीला उद्या म्हणजे गुरुवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याचवेळी त्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा मेसेज व्हायल होत आहे. यादरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या, यात कुणीही राजकारण आणू नये, अशी आर्त हाक पीडित मुलीच्या वडिलांनी दिली.

कल्याण शहर हादरवून टाकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला उद्या म्हणजे गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काही जणांकडून उद्या कल्याण न्यायालयात जमा व्हावे, आरोपी विशाल विरोधात आंदोलन करावे, असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पीडित मुलीचे वडील म्हणाले, 'माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. विशाल गवळी याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणात कुणीही राजकारण, जाती-धर्माचा वाद आणू नये. पोलीस, सरकार मदत करत आहेत. या आरोपीला फाशी मिळावी. माझ्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे .

विशाल गवळी हा सध्या पोलीस कोठडीत आहेत. उद्या त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. त्याला फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा सर्व अंगाने तपास करत पोलिसांनी पुरावे गोळा केले आहेत. नराधम विशाल गवळी याला फाशी शिक्षा होईल, यासाठी दंड थोपटले आहेत. मात्र सोशल मीडियावर काही जणांकडून उद्या कल्याण न्यायालयात जमावे विशाल विरोधात आंदोलन करावे,असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी "माझ्या मुलीला न्याय मिळाला, अशी इच्छा अधोरेखित केली.

पीडित मुलीच्या वडिलांनी नेमकं काय म्हटलं?

'विशाल गवळीला फाशीची शिक्षा व्हावी. या प्रकरणात कुणीही राजकारण, जाती-धर्माचे वाद आणू नये, असे आवाहन केलंय. आम्हाला पोलीस,सरकार मदत करत आहेत. या आरोपीला फाशी मिळावी. माझ्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com