Ganeshotsav 2023: आगमनापूर्वीच लालपरीला बाप्पा पावला; उत्पन्नात झाली घसघशीत वाढ

Kalyan Bus Depot Income Increase: मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्न चौपटीने मिळाले आहे.
Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023Saam Tv
Published On

Kalyan Bus Depot:

कोकणात गणेशोत्सव हा महत्त्वाचा आणि मोठा सण. मुंबई, ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ परिसरात नोकरी धंद्यानिमित्त स्थायिक झालेले कोकणातील चाकरमानी गणेश उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोकणात जात असतात. (Latest Marathi News)

Ganeshotsav 2023
Kokan News: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; १ सप्टेंबरपासून प्रवास होणार वेगवान

यंदाही गणेशेत्सवासाठी कल्याण बस डेपोतून ग्रुप बुकिंगच्या ६२४ गाड्या कोकणात जाण्यासाठी बुक करण्यात आल्या आहेत. या बुकिंगमधून कल्याण एसटी डेपोच्या तिजोरीत १ कोटी ४५ लाख ७७ हजार ६६९ रुपये जमा झाले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्न चौपटीने मिळाले आहे.

कल्याण बस डेपोतून कोकणात गाड्या सोडल्या जातात. डेपोत एकूण ७० गाड्या आहेत. मात्र, सर्वच गाड्या कोकणात सोडता येणार नाहीत. त्यासाठी कल्याण बस डेपोला एसटी महामंडळाने रत्नागिरी, नाशिक, अमरावती आणि अकोले या विविध बस डेपोतील बस उपलब्ध करून दिल्या आहेत.

या बस रत्नागिरी, लांजा, खेड, चिपळूण, मालवण, दिवे आगार, श्रीवर्धन याठिकाणी पाठविण्यात येणार आहेत.कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागच्या वर्षीप्रमाणे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत बस उपलब्ध करून दिल्या आहेत.

यंदा खासदार शिंदे यांनी ५१४ बस बुक केल्या आहेत. त्यामुळे एसटी डेपोला मोठा नफा झाला आहे. उर्वरित बस या ग्रुप बुकिंगच्या आहेत. मागच्या वर्षी ग्रुप बुकिंगमुळे कल्याण बस डेपोला २७ लाख १९ हजार १६५ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा १ कोटी ४५ लाख ७७ हजार ६६९ रुपये उत्पन्न मिळाल्याने ही रक्कम मागच्या वर्षीच्या तुलनेत चौपट आहे.

Ganeshotsav 2023
Nanded ST Bus News : नांदेड जिल्हाअंतर्गत बस सेवा अचानक बंद, प्रवाशांची गैरसाेय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com