Kalicharan Maharaj: १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी; साेमवारी जामीन अर्जावर सुनावणी

आज सकाळी कालीचरण महाराजांना ठाणे न्यायालयात त्यास हजर करण्यात आले.
Kalicharan Maharaj
Kalicharan MaharajSaam Tv
Published On

ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलेल्या कालीचरण महाराज यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात नौपाडा पोलिसांनी आज कालीचरण महाराजांना (kalicharan maharaj) ठाणे न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने कालीचरण महाराजांना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. दरम्यान कालीचरण यांच्या समर्थनार्थ बजरंग दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी केली. (kalicharan maharaj in magistrate custody till 3 feb)

Kalicharan Maharaj
Shahrukh Khan: चाहत्यांची शाहरुख खानला 'We Miss You SRK' माध्यमातून ट्विटरवर परतण्याची साद

अभिजित सरग उर्फ कालीचारण महाराज (kalicharan maharaj) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्या विरोधात आक्षेपहार्य वक्तव्य केल्या नंतर मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी तक्रार दाखल केली हाेती. त्यानूसार ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी रायपुर येथून कालीचरण महाराज यांना अटक करून ठाण्यात आणले हाेते. आज (शुक्रवार) सकाळी ठाणे न्यायालयात त्यास हजर करण्यात आले.

कालीचरण महाराज यांचे वकील पप्पू बोरवाल म्हणाले या प्रकरणी पाेलिसांनी २ दिवसांची पाेलिस काेठडी मागतली हाेती. त्यावर आम्ही युक्तीवाद केला. या ठिकाणी काेणतीही घटना घडली नव्हती तरी देखील राष्ट्रवादीचे मंत्री आव्हाड यांनी सत्तेचा वापर करुन पाेलिसांवर दबाव आणून कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केला. न्यायालयाने (court) आमचा युक्तीवाद ग्राह्य धरुन पाेलिसांची २ दिवसांची पाेलिस काेठडीची मागणी अमान्य केली.

Kalicharan Maharaj
Satara Breaking News: गर्भवती वनरक्षक महिलेस मारहाण; माजी सरंपचासह पत्नीला अटक

दरम्यान कालीचरण महाराज यांच्या जामीन अर्जावर आज निकाल हाेऊ शकला नाही. पाेलिसांनी (police) तपासासाठी वेळ मागितला. त्यामुळे येत्या साेमवारी जामीन अर्जावर निकाल हाेईल असे पप्पू बाेरवाल यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Kalicharan Maharaj
Chandrapur: हरित लवादाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास ठाेठावला पाच काेटींचा दंड
Kalicharan Maharaj
Kalicharan Maharaj: कालीचरण महाराज अटकेत; उद्या नेणार न्यायालयात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com