Kalicharan Maharaj: कालीचरण महाराज अटकेत; उद्या नेणार न्यायालयात

राज्यातील विविध जिल्ह्यात कालीचरण महाराजांवर गुन्हे दाखल आहेत.
Kalicharan Maharaj
Kalicharan MaharajSaam Tv
Published On

ठाणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलेल्या कालिचरण महाराज यांच्यावर राज्यातील विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. नौपाडा पोलिसांनी याच गुन्ह्यात हवे असलेल्या कालिचरण महाराजांना (kalicharan maharaj) आज (गुरुवार) ताब्यात घेतले आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Kalicharan Maharaj Bail hearing Tomorrow)

कालिचरण महाराज यांनी महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले हाेते. त्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली हाेती. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात कालिचरण महाराज यांचा निषेध नाेंदविला गेला. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले गेले.

Kalicharan Maharaj
Gadchiroli: कुरेखेडात भाजप, मूलचेरात एनसीपी- सेना, धानाेरात काॅंग्रेसचा फडकला झेंडा

कालीचरण महाराजांना वर्धा आणि पुणे (pune) पोलिसांनी अटक देखील केली हाेती. आता गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्या तक्रारीनूसार नौपाडा पोलिसांनी कालीचरण महाराजांना रायपूर प्रशासनाकडून ताब्यात घेतलं आहे. उद्या (शुक्रवार) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com