जेष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर

जेष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर (Anant Bagaitkar) यांना पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Anant Bagaitkar
Anant BagaitkarSaam Tv
Published On

मुंबई : जेष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर (Anant Bagaitkar) यांना पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ( Journalism award News )

Anant Bagaitkar
विधान परिषदेच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजी; 'या' माजी मंत्र्याने व्यक्त केली नाराजी

स्वातंत्र्यसैनिक , ख्यातनाम पत्रकार (Journalist) , संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एक आघाडीचे शिलेदार आणि समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या लेखणीतून मांडणारे ध्येयवादी कार्यकर्ते दिनू रणदिवे (Dinu Randive) यांचे १६ जून २०२० रोजी निधन झाले. त्यानंतर घेण्यात आलेल्या त्यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांना अभिप्रेत अशी पत्रकारिता (Journalism) करणाऱ्या पत्रकाराला 'पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार'देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. त्यानुसार हा यंदा पुरस्कार जेष्ठ अनंत बागाईतकर यांना घोषित करण्यात आला आहे.

Anant Bagaitkar
धन-'धान'-धन...शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार; खरीप पिकांसाठी MSP वाढवला

जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या अनेकविध कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणारे जेष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रोख २५००० रुपये आणि सन्मानचिन्ह अशा पारितोषिकाने सन्मानित करण्याचे ठरविण्यात आले आहे. २०२०-२१ या वर्षाचे पहिले पारितोषिक जेष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांना, तर २०२१-२२ या वर्षाचा पुरस्कार जेष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना देण्याचा निर्णय डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखालील गुरबीर सिंह, नरेंद्र वाबळे, हारीस शेख व पुष्पा महाडिक यांच्या समितीने घेतला आहे. पारितोषिक वितरण समारंभ दिनू रणदिवे यांच्या गुरुवारी १६ जून २०२२ या स्मृतिदिनी मुंबईत (Mumbai) होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com