जितेंद्र आव्हाडांचे अर्धनग्न फोटो पोस्ट करणं पडलं महागात; न्यायालयाकडून दोषारोपपत्र दाखल

अनंत करमुसे या व्यक्तीने जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील एक छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारीत केले होते.
Jitendra Awad
Jitendra AwadSaam TV
Published On

रश्मी पुराणिक -

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांचे अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत करणाऱ्या अनंत करमुसे (Anant Karmuse) यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात करमुसे यांनी तपासकामात कोणत्याही प्रकारचे साह्य केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला असून त्यांनी दाखल केलेली याचिकाही स्वच्छ हेतूने केली नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. करमुसे यांचे ट्वीट आणि फेसबुक पोस्ट (Facebook Post) हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचेही न्यायालयाने नमूद केलं आहे.

अनंत करमुसे या व्यक्तीने जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील एक छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारीत केले होते. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी 6 एप्रिल 2020 रोजी भादंवि 292, 500 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 66 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्य़ातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आहे. तसेच अनंत करमुसे यांना समन्सपत्र बजावण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी (Police) करमुसे याच्या वर्तणुकीवर ताशेरे ओढले आहेत. करमुसे यांच्या जप्त केलेल्या फोनमध्ये जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र सापडले होते. मात्र, असे असतानाही करमुसेने पोलिसांना तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचे या आरोपत्रात नमूद करण्यात आले आहे.

आरोपी करमुसेंनी स्वतःच्या मोबाईल फोनमधुन स्वतः चे फेसबुक अकाउंटवरून जितेंद्र आव्हाड यांचा एडीट केलेला अर्धनग्न अवस्थेतील अश्लिल फोटो अपलोड करून प्रसिद्ध केला असल्याने सदरचा मोबाईल फोन जप्त करून फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविला असता, जातीद्वेष-धर्मद्वेष, व्यक्तीद्वेष आदी 27 प्रकारचे द्वेष पसरविणार्‍या पोस्ट करमुसे याने आपल्या वैयक्तिक अकाउंटवरून फेसबुक व ट्विटरवर अपलोड केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

शिवाय करमुसे ५ वर्षांपासून आव्हाड यांना लक्ष्य करीत असून त्याला या कामी अन्य कोण साह्य करीत आहे का? याचा शोध घेण्यासाठी अनंत करमुसे यास सुमारे 5 वेळा समजपत्र पाठवूनही त्याने पोलिसांना सहकार्य केले नसल्याचेही या दोषारोपपत्रात पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या या आरोपत्रात करमुसे याने केलेल्या सर्व गुन्ह्यांचा, जातीद्वेष-धर्मद्वेष पसरविण्याच्या कृत्याचा पाढाच वाचण्यात आला आहे. त्याने केलेले हे गुन्हे दडविण्यासाठीचा त्याचा प्रयत्न आता या दोषारोपपत्रामुळे उघडा पडला आहे. खोटी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन करमुसे याने आपले गुन्हे दडविण्याचा प्रयत्न केला होता. पण, आता प्रथमच त्याचा बुरखा पूर्णपणे फाटला आहे.

दरम्यान, यापूर्वी करमुसे यानेच दाखल केलेल्या याचिकेवर दिलेल्या निकालात उच्च न्यायालयाने अनंत करमुसे याच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तसेच, आपल्याविरोधात विकृत ट्वीट्सबद्दल गुन्हा दाखल आहे, ही बाब तसेच आपले विकृत ट्विट्स याची माहिती याचिका दाखल करताना उच्च न्यायालयापासून लपवून ठेवल्याबाबतही उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. सन 2016 पासून करमुसे हा जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करीत होता. सन 2018 मध्ये आव्हाड यांनी करमुसे याला ब्लॉक केले होते.

आव्हाड हे करमुसे याला प्रतिसाद देत नसतानाही किंवा करमुसे याला ब्लॉक केले असतानाही करमुसे याने, 'आव्हाड यांनी मला ब्लॉक केले आहे. मी आपणाला आवाहन करतो की त्यांना वेगळ्या माध्यमातून लक्ष्य करावे,' असं आवाहन केलं होतं. हे सर्व ट्विट्स उच्च न्यायालयात मांडण्यात आल्यानंतर ही माहिती करमुसेंनी दडवून ठेवली असल्याने .

Jitendra Awad
Vedanta-Foxconn: 'वेदांता' प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा मोदींना फोन; गुंतवणुकीबाबत मोठी मागणी

याचिकाकर्त्याचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक नसल्याचे निरीक्षणही आपल्या न्यायालयाने नमूद केले आहे. विशेष म्हणजे, डाॅ. आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र न्यायालयासमोर आल्यानंतर " हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? " असा प्रश्न विचारत माणूस सुशिक्षित असू शकतो. पण, सुसंस्कृत नाही, अशी गंभीर टिप्पणी करीत सदरचे छायाचित्र न्यायाधीशांनी बाजूला ठेवले आहे.

जितेंद्र आव्हाड यांना ठार मारण्याचा कट

अनंत करमुसे हा ज्या संघटनेचा ठाणे अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. त्याच संघटनेचा सदस्य अविनाश पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घराची रेकी केली होती. तसेच त्याच संघटनेचा सदस्य असलेल्या शाश्वत नावाच्या एका इसमाने आपल्या ट्वीटर हँडलरवरून आव्हाड यांना 'काही मंडळी तुमची वाट पहात आहे. बाहेर निघू नका' अशी धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात आव्हाड यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने अविनाश पवार याला अटक करण्यात आली असून सध्या तो ऑर्थर रोड कारागृहात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com