कालिचरण बाबा विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाड उपस्थित

राष्ट्रवादीचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दाखल केली आहे. त्या आशयाटे ट्विटही त्यांनी केले होते.
कालिचरण बाबा विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाड उपस्थित
कालिचरण बाबा विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाड उपस्थित SaamTv
Published On

ठाणे : अकोला येथील अभिजित सरक उर्फ कालीचरन बाबा याच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ डिसेंम्बर रोजी झालेल्या धर्मसभेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात केलेले आक्षेपहार्य वक्तव्य करून महात्मा गांधी यांच्या हत्येचं समर्थन केले होते, त्याच बरोबर विरोधात जातील त्यांना कापुन टाकेल अस वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नथुराम गोडसे यांचे समर्थन केले. त्यांनी धार्मिक द्वेष पसरवला आहे, या साठी एकूण सहा गुन्हे नोंदवले आहेत. ही तक्रार स्वत: राष्ट्रवादीचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दाखल केली आहे. त्या आशयाटे ट्विटही त्यांनी केले होते.

कालिचरण बाबा विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाड उपस्थित
'हँगओव्हर'पासून मिनीटात आराम मिळवण्यासाठी काही खास गोष्टी

फॅसिजम विरुद्ध मैदानात उतरून लढावच लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. मी स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता कालीचरण बाबा विरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंदवायला चाललो आहे. ही विचारांची लढाई आहे. अशा आशयाचं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी काही वेळापुर्वी केले होते.

दरम्यान धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे तसेच वादग्रस्त कालिचरण महाराज यांच्या विरुद्ध पुण्यात (Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या जातीय भावना दुखविल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडी संघटक कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांचे बंधू नंदकिशोर आणि कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांच्यासह सहा जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस (Police) नाईक सोमनाथ ढगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com