Pune Jejuri Temple: जेजुरीची देवस्थान विश्वस्तपदाचा वाद चिघळला; ग्रामस्थांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, आता पुढे काय?

Pune Jejuri Temple: जेजुरी देवस्थान विश्वस्तपदावरून गावकरी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर जेजुरी ग्रामस्थ आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
Pune Jejuri Temple
Pune Jejuri TempleSaam tv
Published On

Jejuri devasthan trust News : जेजुरी देवस्थान विश्वस्तपदावरून वाद चांगलाच पेटला आहे. जेजुरी देवस्थान विश्वस्तपदावरून गावकरी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर जेजुरी ग्रामस्थ आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. (Latest Marathi News)

जेजुरी देवस्थान विश्वस्तपदाचा वाद चिखळलेला असताना जेजुरीचे ग्रामस्थ आज जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. मात्र जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी भेटीच्या दिलेल्या वेळेच्या काही तास अगोदरच जेजुरीकर ग्रामस्थांनी दालनात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Pune Jejuri Temple
Ajit Pawar News | Balu Dhanorkar यांच्यावर बोलताना काय म्हणाले अजित पवार?

कार्यालयात झालेला हा गोंधळ मिटवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ पुढाकार घेत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जेजुरीकर ग्रामस्थ यांना जाण्यापासून रोखले. पाचव्या मजल्यावरील दालनाच्या बाहेरून सर्वांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जाण्याची सूचना केली.

काही वेळानंतर शिष्टमंडळ जिल्हाधिकारी देशमुख यांची भेट घेतली. या भेटीत ग्रामस्थांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यानंतर जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Pune Jejuri Temple
Failure Party For HSC Failed Students: बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी आयुक्तांकडून 'फेल्युअर पार्टी'; अनोख्या जल्लोषाची जोरदार चर्चा

काय आहे नेमका वाद?

जेजुरी खंडोबा गडाचे व्यवस्थापान पाहणाऱ्या मार्तंड देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळामध्ये स्थानिकांना डावलून सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील लोकांना दिल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. विश्वस्त मंडंळात तीन जण वगळता चौघे हे पुरंदर तालुक्याबाहेरील आहेत. यावरून जेजुरी ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

यावरून काल ग्रामस्थांनी अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. तर आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान, मार्तंड देवस्थान समितीवर बाहेरील व्यक्तींची निवड कोणाच्या आशीर्वादाने झाली आहे. तो हट्ट कुणाचा आहे, असा सवाल जेजुरीकर विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com