जेजुरी देवसंस्थानने पूरग्रस्तांसाठी दिली 11 लाख रुपयांची मदत; मंदिर खुले करण्याचीही मागणी

श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत अकरा लक्ष रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
जेजुरी देवसंस्थानने पूरग्रस्तांसाठी दिली 11 लाख रुपयांची मदत; मंदिर खुले करण्याचीही मागणी
जेजुरी देवसंस्थानने पूरग्रस्तांसाठी दिली 11 लाख रुपयांची मदत; मंदिर खुले करण्याचीही मागणीमंगेश कचरे
Published On

बारामती: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत अकरा लक्ष रुपयांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी भाविकांना दर्शनासाठी व जेजुरी शहरातील व्यवसाय, व्यापार पुन्हा सुरू व्हावेत यासाठी खंडोबा मंदिर दर्शनासाठी लवकर खुले व्हावे अशी मागणी यावेळी देवसंस्थानच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असल्याचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडेपाटील यांनी सांगितले. (Jejuri Dev Sansthan donates Rs 11 lakh for flood victims also Demand for opening of the temple)

हे देखील पहा -

जेजुरी देवसंस्थानच्या वतीने करण्यात आलेली विकासाची कामे, कोव्हिड काळात कोव्हिड रुग्णांसाठी उभारलेले कोव्हिड केअर सेंटर व नागरिकांना करण्यात आलेली मदत याबाबत मुख्यमंत्री यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे दीड-दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीचे खंडोबा मंदिर बंद असल्याने देवावर अवलंबून असणारा खुप मोठा वर्ग आज उपसमारीच्या गर्तेत सापडला आहे. जेजुरी शहराची अर्थव्यवस्था खंडोबा देवाला येणाऱ्या भाविकांच्या अनुषंगाने होणारा व्यवसाय, धार्मिक विधिवर अवलंबून असून मंदिरे बंद असल्याने शहराची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तसेच राज्यातील लाखो भाविकांना कुलदैवताच्या दर्शनाची ओढ आहे.

जेजुरी देवसंस्थानने पूरग्रस्तांसाठी दिली 11 लाख रुपयांची मदत; मंदिर खुले करण्याचीही मागणी
आदेश निघाला; आजपासून सुरु दुकाने चार वाजपर्यंत सुरु ठेवा

यामुळे शासनाने निर्णय घेऊन जेजुरीचे खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे पाटील यांनी केली आहे. जेजुरी देवसंस्थानच्या वतीने भाविकांसाठी सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येणार असून या हॉस्पिटलचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावे अशी ही विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com