आदेश निघाला; आजपासून सुरु दुकाने चार वाजपर्यंत सुरु ठेवा

pandharpur shops opened
pandharpur shops opened
Published On

पंढरपूर : पंढरपूरसह सोलापूर solapur जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील लागू केलेले कडक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आजपासून सर्व दुकानांना दुपारी चार वाजेपर्यंत खूली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

काेविड १९ ची साखळी ताेडण्यासाठी साेलापूर जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांपुर्वी पंढरपूर, सांगाेला, करमाळा, माढा तसेच माळशिरस या पाच तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले हाेते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला हाेता.

या निर्णयाच्या विराेधात व्यापा-यांनी भुमिका घेतली हाेती. पंढरपूरात व्यापा-यांचे सलग तीन दिवस आंदाेलन देखील झाले. या आंदाेलनात व्यापा-यांनी तालुके अनलाॅक करण्याची मागणी केली हाेती. परंतु प्रशासन त्यांच्या भुमिकेवर ठाम राहिले. राज्य शासनाकडे मागण्यांचा पाठपूरावा करु असे आश्वासित केले. त्यानंतर व्यापा-यांनी आक्रमक भुमिका घेत या निर्णयाचा निषेध म्हणून एक दिवस दुकाने सुरु केली.

दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर आजपासून सर्व पाच तालुक्यांमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. श्रावणी सोमवार असल्याने पंढरपुरातील सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या pandharpur shops opened आहेत. भाविकांची संख्या मात्र अत्यल्प आहे.

pandharpur shops opened
Modi Express च्या माेफत प्रवासासाठी यांना करा फाेन : नितेश राणे

प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविक आणि स्थानिक व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या बाजारपेठेत काेविड १९ च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन व्यवहार सुरु आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com