अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर पडत असलेलले IT चे छापे अयोग्य; गृहमंत्र्यांची प्रतिक्रीया

केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैर वापर करत आहे
अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर पडत असलेलले IT चे छापे अयोग्य; गृहमंत्र्यांची प्रतिक्रीया
अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर पडत असलेलले IT चे छापे अयोग्य; गृहमंत्र्यांची प्रतिक्रीयाSaamTV

पुणे : केंद्रीय तपास यंत्रणांचा Central Investigation केंद्र सरकार गैर वापर करत आहे आणि हे यापूर्वी कधी ही पाहायला मिळालेले नाही. अजित दादाच्या सर्वच कुटुंबियांवर अशा धाडी टाकणे योग्य नसल्याचे त्यानी म्हंटल आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या निकटवर्तीयांचे असणाऱ्या कारखान्यांवरती तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या घरावरती देखील आयकर विभागाने छापे टाकत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Dilip Walase Patil यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (IT raids on Ajit Pawar's close associates are inappropriate - Home Minister)

हे देखील पहा -

ते पिंपरी चिंचवड Pimpari Chinchvad मध्ये बोलत होते. दरम्यान आर्यन खान Aryan Khan प्रकरणात एनसीबी NCB च्या धाडीत किरण गोसावी Kiran gosavi आणि भाजप पदाधिकारी पंच म्हणून मनीष भानुशाली उपस्थित असणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे ही पाटील म्हणाले आहेत तर पुण्यतील फसवणूक प्रकरणात किरण गोसावी यांना अजून अटक केलेले नसल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं.

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर पडत असलेलले IT चे छापे अयोग्य; गृहमंत्र्यांची प्रतिक्रीया
मुख्याध्यापकाने केली पालकांना शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल झाल्याने समोर आली बाब !

जनतेंन भाजपलाच येड ठरवलं

दरम्यान अजित पवारांवरती पडत असलेल्या छाप्यांसदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले अशा पाहूण्यांचे येण्याने काही फरक पडणार नसल्याचं वक्तव्यं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं तसचं भाजपने माझ्यावरती देखील ईडीची कारवाई केली पण जनतेंन भाजपलाच येड ठरवलं असा टोला पवारांनी भाजप च्या नेतेमंडळींना लगावला होता.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com