"पालकमंत्री रस्त्यांसाठी ४७२ कोटी देत नाही हे दुर्भाग्यपुर्ण"- आ. रविंद्र चव्हाण

"पालकमंत्र्यांकडून डोंबिवलीमधील रस्त्यांसाठी ४७२ कोटी रुपये दिले जात नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे" असा टोला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी लगावला आहे.
"पालकमंत्री रस्त्यांसाठी ४७२ कोटी देत नाही हे दुर्भाग्यपुर्ण"- आ. रविंद्र चव्हाण
"पालकमंत्री रस्त्यांसाठी ४७२ कोटी देत नाही हे दुर्भाग्यपुर्ण"- आ. रविंद्र चव्हाणप्रदीप भणगे

कल्याण: "पालकमंत्र्यांकडून डोंबिवलीमधील रस्त्यांसाठी ४७२ कोटी रुपये दिले जात नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे" असा टोला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी लगावला आहे. डोंबिवली भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. डोंबिवलीमधील रस्ते आणि इतर रखडलेले विकास कामे यावर चर्चा केली. तसेच आयुक्तांकडे अनुपालन अहवालाची मागणी केली. ("It is unfortunate that the Guardian Minister does not pay Rs 472 crore for roads" said mla Ravindra Chavan)

हे देखील पहा -

याबाबत भाजप आमदार चव्हाण यांनी सांगितले की गेल्या वेळीही अनुपालन अहवालाची मागणी केली होती, मात्र तो देण्यात आला नाही. आजही याबाबत सांगितले अवाहल देणार नाही, टाईमबॉम्बमध्ये कामे पूर्ण करणार नाहीत तो पर्यंत नागरिक सुविधांमध्ये दुर्लक्ष होणार असे आयुक्तांना सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच केडीएमसीमधील समस्या ज्या प्रलंबीत आहेत त्याबाबत अधिवेशनात आज उठवणार आणि सरकारला धरावेवर धरणार असेही आमदार चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले.

"पालकमंत्री रस्त्यांसाठी ४७२ कोटी देत नाही हे दुर्भाग्यपुर्ण"- आ. रविंद्र चव्हाण
गुटखा माफियांची नवीन शक्कल; गुटखा विक्रीसाठी केला जातोय चक्क कचऱ्याचा वापर...

तर खराब रस्त्याबाबत आमदार यांनी वक्तव्य करत सांगितले की, कल्याण डोंबिवलीमध्ये चांगले रस्ते पाहिजेत असे युती असताना आम्हाला नेहमी वाटायचे. पण गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून आणि विशेष म्हणजे पालकमंत्र्यांकडून डोंबिवलीमधील रस्त्यांसाठी आवश्यक असलेले ४७२ कोटी दिले जात नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com