गुटखा माफियांची नवीन शक्कल; गुटखा विक्रीसाठी केला जातोय चक्क कचऱ्याचा वापर...

वसई-विरारमध्ये गुटखा माफियांनी पोलिसांपासून गुटखा लपण्यासाठी कचऱ्याचा वापर केला आहे. मोठ्या प्रमाणावर गुटखा कचऱ्याच्या ढिगार्‍यात लपवून ठेवल्याचे आढळून आले आहे.
गुटखा माफियांची नवीन शक्कल; गुटखा विक्रीसाठी केला जातोय चक्क कचऱ्याचा वापर...
गुटखा माफियांची नवीन शक्कल; गुटखा विक्रीसाठी केला जातोय चक्क कचऱ्याचा वापर...चेतन इंगळे

वसई-विरार: वसई-विरारमध्ये गुटखा माफियांनी पोलिसांनपासून गुटखा लपण्यासाठी कचऱ्याचा वापर केला आहे. मोठ्या प्रमाणावर गुटखा कचऱ्याच्या ढिगार्‍यात लपवून ठेवल्याचे आढळून आले आहे. (Gutkha mafia new tactics; waste is used to sell Gutkha)

हे देखील पहा -

विरार पूर्व मधील मनवेल पाडा परिसरामध्ये एका मोकाट ठिकाणी कचऱ्याच्या ढिगार्‍यात मोठ्या पिशव्यांमध्ये गुटखा लपवून ठेवला होता, मात्र एका नागरिकाला हा लपवून ठेवलेला गुटखा दिसून आला. वसई-विरार पोलिस मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करते. लाखो रुपयांचा गुटखा जप्त करून नष्ट करते, मात्र गुटखा माफिया पोलिसांपासून लपण्यासाठी कचरा असलेल्या मोकाट ठिकाणी गुटखा लपवत आहेत आणि सर्व गुटखा वसई-विरार नालासोपारा शहरात छुप्याने विकत आहे. जवळपास 20 हजार किंमतीचा गुटखा असल्याची माहिती समोर येत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com