IPS अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती, जाणून घ्या त्यांची कारकीर्द

मुंबई पोलीस दलात विशेष आयुक्त हे ऐतिहासिक पद तयार करण्यात आलं आहे. या पदावर प्रथम आयपीएस देवेन भारती यांची नियुक्ती केली आहे.
Deven Bharti
Deven Bharti Saam Tv
Published On

Mumbai News : मुंबई पोलीस दलात विशेष आयुक्त हे ऐतिहासिक पद तयार करण्यात आलं आहे. या पदावर प्रथम आयपीएस देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे देवेन भारती हे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त ठरले आहेत. (Latest Marathi News)

Deven Bharti
Anil Parab: ईडीची मोठी कारवाई! अनिल परब यांची 'इतक्या' कोटींची मालमत्ता जप्त; सोमय्यांनी दिली तिखट प्रतिक्रिया

मुंबई पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्तांकडे किती अधिकार आहेत, याबद्दल माहिती समोर आली नाही. मुंबई विशेष आयुक्ताच्या कार्यालयातून लवकरच याबाबत एक आदेश जारी करण्यात येऊ शकतो.

गृह विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हे विभागाचे सह विशेष पोलीस आयुक्त हे विशेष पोलीस आयुक्त यांना 'रिपोर्ट' करू शकतात.

कोण आहे देवेन भारती?

सध्या आयपीएस विवेक फणसळकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त आहेत. तर १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जातात. २०१४ पासून ते २०१९ ते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुंबईच्या सहपोलीस आयुक्तपदी (कायदा आणि सुव्यवस्था) नियुक्ती करण्यात आली होती.

Deven Bharti
Anil Parab : माझा काय संबंध? ED कारवाईच्या दाव्यानंतर सोमय्यांना परबांचं रोखठोक उत्तर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कमी केले होते अधिकार

दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) प्रमुखपदाची जबाबदारी देवेन भारती यांना दिली होती. मात्र, महाराष्ट्रात २०१९ साली उद्धव ठाकरे सरकार येताच त्यांचे अधिकार कमी करण्यात आले होते. त्यांना राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक करण्यात आले होते.

दरम्यान, १३ डिसेंबर २०२२ रोजी भारती यांच्या जागी सहआयुक्त राजवर्धन यांची नियुक्ती केली होती. तेव्हापासून एटीएसचे माजी प्रमुख विनीत अग्रवाल, ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह आणि लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोचे माजी प्रमुख प्रभात कुमार हे वर्णी लागण्याच्या प्रतीक्षेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com