iPhone 17 साठी कायपण! मुंबईत तुफान राडा, अ‍ॅपल स्टोअरबाहेर एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

BKC Apple Store fight video: आयफोन १७ खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये राडा झाला. मुंबईतील बीकेसी स्टोरबाहेर तरुणांनी एकमेकांना धूधू धुतलं. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
iPhone 17 साठी कायपण! मुंबईत तुफान राडा, अ‍ॅपल स्टोअरबाहेर एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO
BKC Apple Store fight videoSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबई बीकेसी अ‍ॅपल स्टोरबाहेर आयफोन १७ खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी झाली आहे.

  • रांगेत उभ्या राहिलेल्या तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

  • हाणामारीचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

अ‍ॅपल कंपनीने आयफोन-१७ लाँच केला असून हा फोन भारतामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मुंबई, पुण्यातील अ‍ॅपल स्टोरमध्ये हा फोन मिळत असून हे नवे मॉडेल खरेदीसाठी तरुणाईंची प्रचंड गर्दी झाली आहे. फोन खरेदीसाठी रात्रीपासून अनेक जण रांगेमध्ये उभे आहेत. फोन खरेदी करण्यासाठी तरुणांची इतकी तुंबड गर्दी झाली आहे की त्यांना आवरणं कठीण झाले आहेत. मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्पलेक्स म्हणजे बीकेसीमधील अ‍ॅपल स्टोरबाहेर तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

आयफोन १७ खरेदी करण्यासाठी तरुणांनी बीकेसीतील अ‍ॅपल स्टोरबाहेर भली मोठी रांग लावली आहे. हजारो तरुण-तरुणी रांगेत उभे राहिले आहेत. आयफोन खरेदीसाठी त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. सुरक्षा रक्षकांना या गर्दीला आवरणं कठीण झाले आहे. सुरक्षा रक्षक आणि तरुणांमध्ये वाद झाला.

iPhone 17 साठी कायपण! मुंबईत तुफान राडा, अ‍ॅपल स्टोअरबाहेर एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO
iPhone 17 Sale: iPhone 17 ची क्रेझ! मध्यरात्रीपासूनच मुंबईच्या Apple स्टोअरबाहेर लांबच लांब रांगा, VIDEO व्हायरल

त्यानंतर अ‍ॅपल स्टोरबाहेर तुफान राडा झाला. अ‍ॅपल स्टोरबाहेर फोन खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या तरुणांनी एकमेकांना धूधू धुतले. हा वाद मिटवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करावा लागला. या राड्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चर्चेता विषय ठरत आहे.

iPhone 17 साठी कायपण! मुंबईत तुफान राडा, अ‍ॅपल स्टोअरबाहेर एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO
iPhone 17 Launch In India: १९ सप्टेंबरपासून iPhone 17 बाजारात विक्रीसाठी दाखल, जाणून घ्या खास अन् दमदार ऑफर्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com