अॅपलने आयफोन १७, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स भारतात लाँच केले.
₹८२,९०० पासून किंमत सुरू होत असून ₹२,२९,९०० पर्यंत जातात.
क्रोमा स्टोअर्स व Tata Neu अॅपवर एक्सचेंज बोनस, कॅशबॅक आणि सूट उपलब्ध.
नो-कॉस्ट ईएमआयसह संपूर्ण भारतातील ५६० हून अधिक स्टोअर्समध्ये विक्री सुरू.
अॅपलने आयफोन १७ लाइनअप भारतात अधिकृतपणे लाँच केला आहे. आयफोन १७, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स १९ सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून देशभरातील ग्राहकांसाठी विक्रीस उपलब्ध झाले आहेत. यावेळी अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन क्रोमाने खास ऑफर्स आणि आकर्षक योजनांसह ही मालिका ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची घोषणा केली आहे.
क्रोमा स्टोअर्स, TRiBE बाय क्रोमा आउटलेट्स, Croma.com आणि Tata Neu अॅप या सर्व प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असलेल्या या लाँच मोहिमेची सुरुवात १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान होणार असून, ऑफर्स २६ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. त्यानंतर निवडक फायदे कायम राहतील.
भारतभरातील २०६ शहरांमधील ५६० हून अधिक क्रोमा आणि TRiBE स्टोअर्समध्ये तसेच ऑनलाइन माध्यमांतून मिळणाऱ्या या ऑफर्स ग्राहकांना खरेदी अनुभवासह बचतीची संधी देणार आहेत. यामध्ये पात्र उपकरणांवर १२,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, Tata Neu HDFC कार्डद्वारे १०% पर्यंत NeuCoins कॅशबॅक, तसेच अॅपल अॅक्सेसरीजवर २०% पर्यंत सूट उपलब्ध आहे. याशिवाय, निवडक खरेदीवर नो-कॉस्ट ईएमआय सुविधाही दिली जात आहे.
iPhone ची किंमत
किंमतींच्या बाबतीत, आयफोन १७ चे २५६ जीबी मॉडेल ८२,९०० रुपयांना तर ५१२ जीबी व्हर्जन १,०२,९०० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. आयफोन एअरची किंमत १,१९,९०० रुपये आहे. आयफोन १७ प्रोचा २५६ जीबी प्रकार १,३४,९०० रुपये, ५१२ जीबी प्रकार १,५४,९०० रुपये आणि १ टीबी प्रकार १,७४,९०० रुपये इतक्या किंमतीत देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आयफोन १७ प्रो मॅक्सचे २५६ जीबी मॉडेल १,४९,९०० रुपये, ५१२ जीबी १,६९,९०० रुपये, १ टीबी १,८९,९०० रुपये आणि सर्वाधिक स्टोरेज असलेले २ टीबी मॉडेल २,२९,९०० रुपये इतक्या किमतीला उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.