Diamond Market: देशातील सर्वात मोठे डायमंड हब मुंबईतच होणार; उद्योगमंत्री सामंत

Diamond Market: मुंबईतील हिरे व्यापाराची वार्षिक उलाढाल सुमारे २ ते अडीच लाख कोटी रुपये आहे.
uday samant
uday samantSaam Tv
Published On

Industries Minister Samant Comment on Diamond Market:

मुंबईतील हिरे व्यवसाय बंद करुन सुरतला स्थलांतरित होत आहेत. यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. राज्यातील उद्योग बाहेर राज्यात जाण्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यावर टीका करत आहेत. मुंबईतील हिरे व्यापार सुरतला हलवला जात असल्यानं मुंबईचं महत्व कमी करण्यात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलंय. (Latest News)

सुरतमध्ये हिरे व्यापाऱ्यासाठी भव्य इमारत बांधण्यात आलीय. या ठिकाणी सुरत डायमंड बोर्स स्थालांतरित होत आहे. यामुळे सूरत डायमंड बोर्सकडून मुंबई आणि महाराष्ट्र सरकारला कराच्या रूपात मिळणारा पैसा आता मिळणार नाही. मुंबईतील हिरे व्यापाराची वार्षिक उलाढाल सुमारे २ ते अडीच लाख कोटी रुपये आहे. आता या व्यवहाराचा फायदा गुजरात सरकारला फायदा होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावर आपलं स्पष्टीकरण देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, येत्या वर्षभरात नवी मुंबईत देशातील सर्वात मोठे डायमंड सेंटर सुरू होणार आहे. त्यासाठी धोरण तयार करण्यात आहे. विरोधकांना उत्तर देताना सामंत म्हणाले की, डायमंड हिरे ज्वेलरी हब नवी मुबंईतच होईल. परंतु अन्य लोक टार्गेट करून बोलत आहेत.

गैरसमज निर्माण करत आहेत. जगातील ७० ते ८० टक्के हिऱ्यांच्या व्यापारावर भारतीयांचे नियंत्रण आहे. सुरत डायमंड बोर्स येथे वन स्टॉप सोल्युशन म्हणून जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. सुरत डायमंड बाजाराचा दुसरा टप्पाही प्रस्तावित आहे.

देशातील मुंबई आणि सुरत या शहरांमध्ये हिरे उद्योगासाठी स्पर्धा निर्माण झालीय. यामुळेच सुरतमध्ये सूरत डायमंड बोर्स सुरू होत आहे. सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी ३ हजार ४०० कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र गुजरातमध्ये तयार केलंय.

डिसेंबरमध्ये सुरत येथे हिरे बाजार सुरू होणार आहे. सुरत हे देशाचे प्रमुख हिरे व्यापार केंद्र म्हणून मुंबईला मागे टाकण्यास सज्ज झालंय. त्यामुळे मुंबईतील हिरे व्यापारी सुरत डायमंड बोर्समध्ये तळ हलविण्याचा विचार करत आहेत. यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहे. परंतु विरोधकांचे आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावलेत.

uday samant
Andhashraddha Nirmoolan Samiti : करणीच्या बहाण्याने 60 हजार उकळणारा भोंदूबाबा शाहूपुरी पोलीसांची ताब्यात, अंनिसच्या प्रयत्नाला यश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com