Indian Railway : रेल्वेने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खरेदी केला २२,५०० रुपयांचा विद्युतरोधक जोडा; २५ हजार व्होल्टचा झटकाही सहन करता येणार

Central Railway : टीआरडी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आता मध्य रेल्वेने खास विदेशांतून विद्युतरोधक जोडे खरेदी केले आहे. हे जोडे घालून ओएचईचे काम करत असताना २५ हजार व्होल्टचा विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यावरही कर्मचारी सुरक्षित राहतील.
Indian Railway
Indian RailwaySaam Digital

ओएचईच्या संपर्कात आल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसून मृत्युमुखी पडत असल्याचा अनेकदा घटना घडल्या आहे. त्यामुळे टीआरडी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आता मध्य रेल्वेने खास विदेशांतून विद्युतरोधक जोडे खरेदी केले आहे. हे जोडे घालून ओएचईचे काम करत असताना २५ हजार व्होल्टचा विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यावरही कर्मचारी सुरक्षित राहतील अशा विश्वास मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक रजनिश कुमार गोयल यांनी व्यक्त केला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दररोज १८१० उपनगरीय लोकल फेऱ्या आणि दीडशे पेक्षा जास्त मेल/एक्स्प्रेस गाड्या धावतात. भारतातील रेल्वे सर्वाधिक व्यस्त विभाग म्हणून मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ओळखला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विभागात ४ ते ६ लाईन्स आणि इतर विभागांमध्ये २ लाईन्ससह ५५५ किमी पर्यंत रेल्वे मार्गिका आहे. रेल्वे मार्गिकेवरील ओव्हर हेड वायरलच्या तपासणी आणि नियमित देखभाल दुरुस्ती केली जाते.

टॉवर वॅगनद्वारे ओव्हर हेड वायरच्या दुरुस्तीसाठी टीआरडी (ट्रॅक्शन डिस्ट्रीब्यूटर ) कर्मचारी काम करत असते. अनेकदा ओव्हर हेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी टॉवर वॅगनद्वारे क्रॉसओवर आणि टर्नआउट तपासण्यासाठी मोठ्या आवाहनाला रेल्वे कर्मचाऱ्यांना तोड द्यावेत. अनेकदा विद्युत प्रवाहाच्या संपर्कात असल्याने विजेचा धक्का बसून अनेक टीआरडी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे टीआरडी कर्मचाऱ्यां सुरक्षेसाठी रेल्वेने सर्वाधिक उच्च दर्जाचे विद्युतरोधक जोडे खरेदी केले आहे.

Indian Railway
Maharashtra Politics 2024 : मुख्यमंत्र्यांची राऊतांना नोटीस; संजय राऊतांना 'रोखठोक' भोवणार?

मलेशियातून आणले जोडे

सध्या मध्य रेल्वेने विद्युतरोधक ११ जोड्या खरेदी केल्या आहे. हे विद्युतरोधक जोडे मलेशियातून खरेदी केलेले आहे. विशेष म्हणजे एक जोडण्याची किमंत २२ हजार ५०० रुपये इतकी आहे. या जोडण्यातून २५ हजार केव्ही विद्युत प्रवाह असलेल्या विज वाहिनीवर काम करू शकतात. सध्या हे विद्युतरोधक जोडे फक्त परदेशात तयार केले जातात.

Indian Railway
Ajit Pawar vs Anjali Damania : पुणे अपघात प्रकरणावरून राजकारण तापलं; अंजली दमानियांनीही अजित पवारांचं आव्हान स्वीकारलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com