Chitra Ramkrishna: कथित 'योगी'च्या सांगण्यावरून निर्णय घेणाऱ्या NSEच्या माजी CEOवर आयटीचा छापा

मुंबई तसेच पुण्यात अनेक ठिकाणी ED ची छापेमारी सुरु असताना आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांच्या मुंबईतील (Mumbai) घरावर आयकर विभागाने (Income Tax Department) छापा टाकला आहे.
Chitra Ramkrishna
Chitra RamkrishnaSaam Tv
Published On

मुंबई : मुंबई तसेच पुण्यात अनेक ठिकाणी ED ची छापेमारी सुरु असताना आता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांच्या मुंबईतील (Mumbai) घरावर आयकर विभागाने (Income Tax Department) छापा टाकला आहे. सोबतच मिळालेल्या माहितीप्रमाणे तत्कालीन ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांच्या परिसरात देखील झडती सुरू आहे. चित्रा यांच्यावर NSE शी संबंधित गोपनीय माहिती एका आध्यात्मिक योगीसोबत शेअर केल्याचा आरोप आहे.

मागील काही दिवसांपूर्वी रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) चित्रा रामकृष्ण यांना 3 करोड रुपयांचा दंड ठोठावला होता. एक्सचेंजची अंतर्गत गोपनीय माहिती अज्ञात व्यक्तीसोबत शेअर केल्याबद्दल बाजार नियामकाने चित्रा यांना दंड ठोठावला आहे. रिपोर्टनुसार, चित्रा रामकृष्णा यांनी सांगितलं होत की, त्यांनी अस एका योगी च्या सांगण्यावरून केलं होत जो हिमालयात राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर/चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांच्या जागेवरही छापे टाकण्यात आले आहेत.

Chitra Ramkrishna
दुर्दैवी: बीडमध्ये ट्रॅक्टर-पिकअपच्या भीषण अपघातात बाप-लेकाचा मृत्यू

NSE हे भारतातील सर्वात मोठे स्टॉक मार्केट आहे, ज्यामध्ये दररोज 49 कोटी व्यवहार होतात. NSE ची एक दिवसाची उलाढाल 64 हजार कोटी आहे. या बाजारात दररोज मोठ्या संख्येने गुंतवणूकदार व्यापार करतात.

वृत्तानुसार, चित्रा रामकृष्ण या मागील 20 वर्षांपासून हिमालयातील कथित योगीच्या सल्यानुसार आपल्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेत होते. तसेच शेअर बाजाराशी (Share Market) संबंधित महत्वाची माहितीही त्या, त्या कथित योगीला पाठवत होत्या. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत त्या एकादाही या योगीला भेटलेल्या नाहीत. हे योगी कुठेही प्रकट होऊ शकतात असा त्यांचा दावा आहे. SEBI ने काढलेल्या आदेशामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

काय आहे प्रकरण?

अनेक वर्षांपासून अज्ञात योगींच्या सांगण्यावरून एवढा मोठा शेअर बाजार सुरू होता, हे सत्य जाणून सर्वांनाच धक्का बसणारे आहे. या संपूर्ण गेममध्ये तीन मुख्य पात्रे होती. पहिले आणि महत्त्वाचे पात्र होत्या NSE चे माजी CEO चित्रा रामकृष्ण. दुसरे पात्र म्हणजे आनंद सुब्रमण्यम, तिसरे पात्र एक अदृश्य आणि अज्ञात योगी आहे, जो हिमालयात भटकतो आणि चित्रा यांच्या मते एक परिपूर्ण मनुष्य आहे. चित्रा 2013 ते 2016 या कालावधीत NSE चे CEO होत्या आणि या काळात शेअर बाजारातील सर्व छोटे-मोठे निर्णय अज्ञात योगींच्या इशाऱ्यावर होत होते.

अनेकांचा असा दावा आहे की, सुब्रमण्यम हे अज्ञात योगी आहेत आणि अशा प्रकारे ते चित्राला त्यांच्या पद्धतीने नियंत्रित करत होते. एनएसईनेही सेबीकडे सादर केलेल्या याचिकेत हा युक्तिवाद केला आहे आणि मानवी वर्तनावरील तज्ज्ञांचे मत नमूद केले आहे. मात्र, सेबीने हा आरोप खरा असल्याचे मान्य केले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com