Kalyan News: कोकणातील पर्यटनाला मिळणार चालना, सिंधुदुर्गातील फिश अ‍ॅक्वेरियमचे 11 सप्टेंबरला उद्घाटन

Ravindra Chavan News: कोकणातील पर्यटनाला मिळणार चालना, सिंधुदुर्गातील फिश अ‍ॅक्वेरियमचे 11 सप्टेंबरला उद्घाटन
Ravindra Chavan
Ravindra ChavanSaam TV
Published On

>> अभिजित देशमुख

Sindhudurga Fish Aquarium News:

कोकणातील निसर्ग सौंदर्य अनेकांना भूरळ पाडतं. निसर्गाचे सौंदर्य कोकणाकडे असल्याने कोकण समृद्ध आहे. याच कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

मंत्री चव्हाण म्हणाले, कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढले पाहिजे. त्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकाला तिकडे सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, महत्त्वाच्या पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम सोय झाल्या पाहिजेत सिंधुदुर्गत अनेक पर्यटक सकाळच्या सुमारास जातात पर्यटन करता, पर्यटन स्थळ पाहतात. मात्र रात्री गोव्याच्या दिशेने जात असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी तिथे राहण्याची व्यवस्था उत्तम प्रतीच्या कशा होतील. त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केला तर नक्कीच पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल असे सांगितले.

Ravindra Chavan
Maratha Andolan: 'आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या', गिरीश महाजनांची आंदोलकांना विनंती

यातच कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग फिश अ‍ॅक्वेरियम तयार करण्यात आलंय. या फिश अ‍ॅक्वेरियममध्ये गोड्या पाण्यातील तसेच खाऱ्या पाण्यातील मासे, रंगीबेरंगी मासे विथ प्रजातीचे मासे हे पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत. येत्या 11 तारखेला हे फिश अ‍ॅक्वेरियम सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

गणपतीच्या आधी शहरातील रस्ते सुस्थितीत असले पाहिजेत, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे पालिका आयुक्ताना निर्देश

कल्याण डोंबिवली शहरात मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे रस्त्यांची पुरती दुर्दशा झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घरातील रस्ते गणपतीपुळे सुस्थितीत असले पाहिजेत, असे निर्देश पालिका आयुक्ताना देणार असल्याचे सांगितले.

Ravindra Chavan
Maratha Andolan: मोठी बातमी! अजित पवार आपल्या आमदारांसह घेणार जालन्यात मराठा आंदोलनकर्त्यांची भेट, सूत्रांची माहिती

पुढे बोलताना डोंबिवली शहरातील सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. डॉ श्रीकांत शिंदे यांनी या रस्त्यांसाठी 360 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 130 कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध केला आहे. यातून पुढील वर्षभरात शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे होतील आणि नागरिकांची खड्डे रस्त्यातून कायमची सुटका होऊ शकेल, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com