मावळ परिसरात भात लावणीला सुरुवात

मावळ तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे.
मावळ परिसरात भात लावणीला सुरुवात
मावळ परिसरात भात लावणीला सुरुवातSaam tv
Published On

दिलीप कांबळे

मावळ : मावळ तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. मावळात आंबेमोहर, साळ, दोडकी, कोळम, इंद्रायणी या पारंपारिक भातासह कोकणी, पार्वती, फुलेसमृध्दी, बासमती, रूपाली, रत्ना, साईराम, सोनम, सुरूची, वैष्णवी व तृप्ती या संकरित विकसित भाताच्या वाणालाही मावळात उत्तम प्रतिसाद आहे. मावळातील पश्चिम खो-यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने याठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोळम आणि इंद्रायणी भातांची मोठ्याप्रमाणात लागवड केली जाते. तर मावळ तालुक्यात पारंपारिक चारसुत्री,पट्टा पद्धत,एस आर टी, व इतर पद्धतीने भात लागवड केली जाते.

मावळात सध्या पाऊसाने सुरुवातीला जोरदार हजेरी लावल्याने भात लावणीला सुरुवात झाली आहे. पवनमावळ परिसरातील शेतकर्यांनी पवनाधरणाच्या पाण्यावर भात पेरणी केली जाते. आणि ती भात रोपे चांगल्या प्रमाणात उगवुन आली आहे. रोपे लावण्यास योग्य झाल्याने तसेच पाऊस चांगला झाल्याने भातखाचरात मुबलक पाणी झाल्याने शेतकर्यांनी आता भात लावणीला सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी आपल्या भात रोपांना खते मारण्याच्या तयारीत आहे. काही शेतकरी पुढील दहा पंधरा दिवसात भात लावणीला सुरुवात करणार आहे. मात्र पाऊसाची उघडझाप सुरुचं असल्यामुळे भात लावणी ल‍ांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मावळ परिसरात भात लावणीला सुरुवात
अकोल्यात पुरेश्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

दरम्यान पवन मावळातील कडधे या गावचे शेतकरी नितिन तुपे यांनी पवनाधरणाच्या पाण्यावर पंचवीस मे रोजी भात पेरणी केली होती. भात रोपेही चांगल्या प्रमाणत तयार झाली असुन आता भात लावणीला सुरुवात केली आहे.तर त्यांचे सहा एकर क्षेत्र असुन दिड एकवर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पट्टा पद्धतीने भात लागवड करण्यास सुरवर केली आहे. तर उरवरीत भात लावणी हि पांरपारीक पद्धतीने करणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com