पुणे: 'तसले' Video Viral करण्याची धमकी देत महिलेला विकायला लावले रो हाऊस

पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे
विमानतळ पोलीस स्टेशन, पुणेगोपाल मोटघरे
Published On

गोपाल मोटघरे

पुणे: पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयसीला ब्लॅकमेल करून तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, तिला तिचा रो हाऊस (Row House) विकण्यास भाग पाडल आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून प्रियकर पुरुषोत्तम बुटानी आणि त्याचा मित्र वासुदेव पाटील यांच्या विरोधात विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये (Vimantal Police Station, Pune) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे
महावितरणला शेतकऱ्यांनी सुचना देऊनही वायर बदलले नाही; 4 एक्कर ऊस जळून खाक!

संबंध प्रस्थापित करत असताना मित्राने काढला व्हिडीओ!

मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम बुटांनी हा बांधकाम व्यवसायिक असून, बुटानी हा फिर्यादी महिलेच्या वडिलाच्या ओळखीचा आहे. त्याचे व फिर्यादी महिलेचे 2012 पासून प्रेमसंबंध होते. याचाच फायदा घेत पुरुषोत्तम बुटाणी यांनी पीडित महिलेशी प्रेमसबंध स्थापित करुन पीडित महीलेला लोहगाव, बाणेर आणि वाघोली येथील विविध लॉजवर नेऊन तिच्याशी वारंवार शरीर संबंध स्थापित केले. प्रियकर शरीर संबंध स्थापित करत असताना प्रियकराचा मित्र वासुदेव पाटील यांनी पीडित महिलेचा खासगी व्हिडीओ रेकॉर्ड केले, फिर्यादीत म्हटले आहे.

'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी;

त्यानंतर, दोघांनी फिर्यादी यांना त्यांच्या नावावर असलेला रो हाऊस विकण्यास सांगितले. त्या बदल्यात तिला एक दुकान व फ्लॅट देण्याचे आश्वासनही दिले. मात्र, याला महिलेने विरोध दर्शविल्यावर त्यांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि रो हाऊसच्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या. मात्र, प्रत्यक्षात रो हाऊस विकल्यानंतर पीडित महिलेला फ्लॅट आणि रदुकान देण्यात आल नाही. त्यामुळे प्रियकराने आणि त्याच्या मित्राने पीडित महिलेला तिचा रो हाऊस विकण्यास भाग पाडले असे पीडितेने आपल्या तक्रारीत लिहल आहे.

हे देखील पहा-

आता भाड्याच्या घरात राहण्याची वेळ;

यानंतर त्यांनी रो हाऊस परस्पर जाऊन विकला. त्या बदल्यात आलेले पैसे फिर्यादीला दिले नाहीत. तर, दुकान, फ्लॅटही न दिल्याने पीडितेला आता भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. तर, फिर्यादी महिलेचे शारीरीक, मानसिक, आर्थिक शोषण केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जोगन, विमानतळ पोलीस तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com