Maharashtra Politics : राष्ट्रवादीचं आता फायनल ठरलं; शिंदे-फडणवीस सरकारला घेरणार, काय आदेश निघालेत?

NCP News: शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नवी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.
Sharad Pawar File Photo
Sharad Pawar File Photo Saam TV
Published On

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशात शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नवी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी अधिक आक्रमक व्हावं, शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांची प्रकरणं बाहेर काढावी, अशा सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षश्रेष्ठीकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar File Photo
Eknath Shinde's Reaction on Budget : ' गरीबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा आणि उद्योगाला उभारी देणारा'; CM शिंदेंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील घडामोडींना वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील वरिष्ठांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी यापुढील काळात अधिक आक्रमक व्हावं, असं देखील सांगण्यात आलं आहे.

इतकंच नाही तर, शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची तसेच नेत्यांची घोटाळा प्रकरणे बाहेर काढावी, अशा सूचना देखील या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून आमदारांना देण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर आमदारांचा समावेश होता. (Maharashtra Political News)

Sharad Pawar File Photo
Thane News: स्थानिक गुंडाच्या धमकीने तरुण घाबरला, उचललं टोकाचं पाऊल; ठाण्यातील धक्कादायक घटना

कसबा निवडणूक लढण्याची तयारी

या बैठकीत कसबा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार देण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूकत्रांनी दिली आहे. कसबा निवडणुकीत भाजपला मोकळं रान मिळू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. ही निवडणूक इतर पक्ष सिरीअसली घेणार नाहीत. त्यामुळं ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढविण्याच्या तयारीत आहे.

या बैठकीत राष्ट्रवादीकडून इच्छुकांची नावं सुद्धा घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. तसेच निवडणुकीत पक्षाचा अजेंडा कसा असावा. पूर्वतयारी कशी करावी, या विषयावर चर्चा झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. कसबा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाला जागा दिली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संबंधित महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करतील, असं एकमत सुद्धा बैठकीत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com