Police Bharti: मुंबई पोलीस दलातील १२ हजार ८९९ पदं त्वरित भरा, वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Varsha Gaikwad: मुंबई पोलीस दलातील थोडीथोडकी नाही, तर तब्बल १२,८९९ पदं रिक्त आहेत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
Varsha Gaikwad On Police Bharti
Varsha Gaikwad On Police BhartiSaam Tv
Published On

Varsha Gaikwad On Police Bharti:

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शहराच्या सुरक्षेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणाऱ्या मुंबई पोलीस दलावर सध्या रिक्त पदांमुळे प्रचंड ताण येत आहे. एकीकडे NCRB च्या २०२२-२३ च्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक गुन्हे घडणाऱ्या शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानावर असताना दुसऱ्या बाजूला मुंबई पोलीस दलातील थोडीथोडकी नाही, तर तब्बल १२,८९९ पदं रिक्त आहेत. यात हवालदारांपासून ते थेट अतिरिक्त आयुक्तांपर्यंतच्या पदांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांवर पडणारा ताण लक्षात घेऊनही सरकार ही पदं भरत नसल्याचा निषेध करत ही पदं तातडीने भरून पोलीस दलाला सक्षम करावं, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

जगातील उत्कृष्ट पोलीस दलांमध्ये मुंबई पोलिसांची गणना होते. मुंबईतील गुन्हेगारी विश्वाचा कणा मोडणं असो किंवा २६/११ हल्ल्यातील अतिरेक्यांचा सामना करणे असो, मुंबई पोलीस दलाने नेहमीच दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे. अशा पोलीस दलाला शस्त्र आणि संख्याबळसह सक्षम करणं आवश्यक आहे. मात्र, याच मुंबई पोलीस दलात हवालदार ते अतिरिक्त पोलीस आयुक्तांपर्यंत विविध १२ हजार ८९९ पदं रिक्त आहेत. सरकारच्या या बेपर्वाईचा तीव्र निषेध करतो, असं त्या म्हणाल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Varsha Gaikwad On Police Bharti
Udhav Thackeray On BJP: भ्रष्टाचाऱ्यांना मान पण शंकराचार्यांना नाही, उद्धव ठाकरेंची भाजपवर नाशिकमधून चौफेर फटकेबाजी

वर्षा गायकवाड म्हणाल्या, २०२२ या एका वर्षात मुंबईत ८९ हजार ०९८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी १३५ प्रकरणं खुनाची होती आणि २४५ प्रकरणांमध्ये खुनाचा प्रयत्न झाला. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्येही मुंबई दिल्लीच्या खालोखाल होती. २०२२ मध्ये महिलांवर १ हजार ८५९ हल्ले झाले. तर लैंगिक अत्याचारांची ३५० प्रकरणं नोंदवण्यात आली होती.  (Latest Marathi News)

बलात्काराची ३७० प्रकरणं नोंदवली गेली होती. या सर्व तपासात पोलीस बळ कमी पडत आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांमधील गुन्हेगारीचा विचार करता, मुंबई सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. एकीकडे मुंबईतील गुन्ह्यांची प्रकरणं वाढत असताना सायबर गुन्ह्यांसारखे नवे तंत्रज्ञानावर आधारित गुन्हे समोर येत आहेत, अशीही माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

Varsha Gaikwad On Police Bharti
Sanjay Raut: 'मोदी फक्त दोघांनाच घाबरतात, शेतकरी अन् ठाकरे...' नाशिकच्या महासभेत राऊतांची फटकेबाजी

मुंबई या अत्यंत महत्त्वाच्या शहराची सुरक्षा ज्यांच्या हाती आहे, त्या मुंबई पोलीस दलातील एवढी पदं रिक्त असणं हे मुंबईकरांसाठी धोकादायक आहे. सरकारची याबाबतची निष्क्रियता चिंताजनक आहे. या सगळ्याची तातडीने दखल घेत पोलीस दलातील ही पदं लवकरात लवकर भरावी, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com