मोहित कंबोज यांच्या घरात बेकायदा बांधकाम-सुत्र; पालिका कारवाई करणार?

सांताक्रुझ पश्चिम येथील एसव्हीपी रोडवर खुशी प्राइड बेलमोंडो या तेरा मजली बिल्डिंगमध्ये भाजपचे मोहित कंबोज यांचे चार फ्लॅट आहेत.
Mohit Kamboj News
Mohit Kamboj NewsSaam Tv
Published On

मुंबई: मोहित कंबोज यांच्या घरात बेकायदा बांधकाम झाल्याचं पालिकेच्या तपासणीत उघड झाल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या सांताक्रुझ पश्चिम मधल्या घरात बेकायदा बांधकाम झालं असल्याचं पालिकेच्या तपासणीत उघड झालं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सांताक्रुझ पश्चिम येथील एसव्हीपी रोडवर खुशी प्राइड बेलमोंडो या तेरा मजली बिल्डिंगमध्ये भाजपचे मोहित कंबोज यांचे चार फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रारी पालिकेच्या एच/पश्चिम कार्यालयात करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेने कँबोज यांना २१ तारखेला नोटीस पाठवली होती. त्यानुसार आज पालिकेच्या ४ अधिकाऱ्यांनी कँबोजच्या घराची सुमारे साडेतीन तास तपासणी केली.

Mohit Kamboj News
'एक पुतिन दिल्लीत बसलेत, एक पुन्हा येईल'; मोदी, फडणवीसांचं नावं न घेता राऊतांची टीका (पहा Video)

आजच्या तपासणी नंतरच्या माहितीची पडताळणी पालिकेकडून केली जात असून लवकरच पुढील कारवाई बाबत पालिका निर्णय घेणार आहे. मोहित कंबोज यांच्या घराच्या बांधकामाआधी सादर केलेल्या मूळ आराखड्यात बांधकामात बदल करण्यात आल्याचं पालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीत समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे. वाहनतळ, पोडीयममध्ये आराखड्यात बदल करण्यात आला आहे. प्रत्येक मजल्यावर मोकळी जागा ठेवणं बंधनकारक असतं, पण या सगळ्या बाबींमध्ये बागकामा दरम्यान अनियमितता पालिका अधिकाऱ्यांना आढळल्याची सूत्रांची माहिती आहे.

सध्या आज केलेल्या पाहणीच्या सर्वेक्षणाचा अहवाल पालिका अधिकारी तयार करत आहेत. अहवाल तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा मोहित कंबोज यांना पालिकेकडून नोटीस पाठवली जाणार आहे. या नोटिशीत अनियमित बांधकामा बाबत खुलासा करण्यास सांगितले जाईल, आणि अनधिकृत बांधकाम का तोडू नये ? याची विचारणा केली जाईल. येत्या १ ते २ दिवसात ही नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती समोर आलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com