हिंमत असेल तर अफगाणिस्तानात जाऊन तालिबानवर टीका करा - आ. अतुल भातखळकर

प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांची तुलना चक्क तालिबानशी केली आहे.
हिंमत असेल तर अफगाणिस्तानात जाऊन तालिबानवर टीका करा - आ. अतुल भातखळकर
हिंमत असेल तर अफगाणिस्तानात जाऊन तालिबानवर टीका करा - आ. अतुल भातखळकरSaam Tv News
Published On

मुंबई: प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांची तुलना चक्क तालिबानशी केली आहे. त्यानंतर या हिंदुत्ववादी संघटनांसह भाजपदेखील आक्रमक झाले आहे. भाजपचे आमदार अतुल भातळकर यांनी आता या वादात उडी घेतली आहे. त्यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका करत त्यांना थेट अफगाणिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. (If you have the courage, go to Afghanistan and criticize the Taliban. Atul Bhatkhalkar)

हे देखील पहा -

नक्की काय म्हणाले अतुल भातखळकर?

अतुल भातखळकर यांनी व्हिडिओ ट्विट करत जावेद अख्तरांवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे आहेत हे जावेद अख्तर यांचं विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस असून समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे.

जावेद अख्तर हे विसरत आहेत की, या हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा आणि तालिबानवर टीका करा. त्यामुळे जावेद अख्तर आपलं विधान मागे घ्या. हिंदू समाजाची क्षमा मागा नाहीतर तुमच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला केला जाईल,” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

हिंमत असेल तर अफगाणिस्तानात जाऊन तालिबानवर टीका करा - आ. अतुल भातखळकर
Mumbai: कोरोनानंतर आता डेंग्यूच्या रुग्णसंख्येत अधिक वाढ

जावेद अख्तर काय म्हणाले होते?

जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांची तुलना तालिबानशी केली होती. या समघटनांना तालिबानी विचारसरणीचे असल्याचं म्हणत त्याला समर्थन देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे म्हटले होते. आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखे आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, पण जर संधी मिळाली तर ते सीमा ओलांडतील असे जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे भाजपचे अनेक नेते आता जावेद अख्तरांचा विरोध करताना दिसत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com