मुंबई: मुंबईत मोबाईल चोरीच्या घटना वाढत असल्या तरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस फक्त हरवल्याची तक्रार दाखल करुन घेतात. मात्र, आता नागरिकांचा मोबाईल हरवला की, दखलपात्र गुन्हा नोंदवायचे आदेश आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत (If the mobile is stolen a case of theft will be filed Police Commissioner Sanjay Pandes order).
मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत नुकत्याच घेण्यात आलेल्या एका बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. तसेच मिसिंग प्रॉपर्टीबाबत कोणतीही नोंदवही ठेवू नये, असंही आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांनी सांगितलं.
पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल करुन न घेतल्यास संबधित अधिकाऱ्यावर भा.द.वि कलम 166 (अ) अन्वेय कारवाई करण्यात येईल, अशा सूचना आयुक्तांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी मोबाईल (Mobile) हरवल्यास नागरिकांच्या मोबाईलची मिसिंग तक्रार नोंदवली जात होती.
कलम 166 अ काय सांगते?
भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 166 नुसार, सरकारी कर्मचारी जो कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने, कायद्याचे उल्लंघन करतो. तसेच, जो एखाद्याचा अपमान करतो, त्यावर या कलमांतर्गत कारवाई केली जाते.
या कायद्यांतर्गत त्या सरकारी कर्मचाऱ्याला कारावासाची शिक्षा दिली जाऊ शकते, जी एक वर्षांपर्यंत वाढू शकते किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.