नवी मुंबई : भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याकडून एका पीडित महिलेने तिला मूल असल्याचा दावा केला आहे. तसंच आपल्या मुलाल त्याचा संपूर्ण अधिकार देण्याची मागणी केली आहे. याबाबत सदर महिलेने शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना पत्र लिहून आपणाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.
या प्रकरणाबाबत बोलताना पीडित महिलेने पत्रकारांना सांगितलं की, 'मी नीलम ताईंकडे तक्रात घेऊन आली आहे. गणेश नाईक यांच्यापासून मला मूल आहे. मला न्याय मिळावा, मी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 1993 पासून मी गणेश नाईक यांना ओळखते. माझ्या मुलाला त्याचा हक्क मिळावा हे मला अपेक्षित आहे. मला गणेश नाईक याच्यावर विश्वास राहिला नाही.' असं वक्तव्य त्यांनी केलं असून नाईक यांनी मला जे करायचे ते कर असं सांगितलं असल्याचंही पीडित महिलेनं सांगितलं.
पाहा व्हिडीओ -
दरम्यान, या प्रकरणाची दखल नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. त्या म्हणाल्या, 'समाजामध्ये हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. गणेश नाईक यांच्याशी 1993 पासून यांचे गणेश नाईक यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत अशा त्या सांगत आहेत. त्यामुळे मी नवी मुंबई पोलिसांशी बोलले असून त्यांनी मला अदखलपात्र गुन्हा नोंद केल्याचे सांगितले आहे.
मात्र, मी नवी मुंबई पोलीस (Navi Mumbai Police) आयुक्तांना पत्र लिहून नाईक यांची DNA टेस्ट करावी अशी मागणी केली आहे. तसंच त्यांनी गणेश नाईकांना त्यांनी डी.एन.ए. टेस्टसाठी समोर येण्याचं आवाहनही केलं आहे. मुलाला न्याय मिळायला हवा. डोक्याचा एक केस काढला तरीही DNA टेस्ट होऊ शकते, शिवसेना (Shivsena) जे शक्य आहे ते करणारच आहे. गणेश नाईक यांचे नवी मुंबईतील स्थान होते ते कमी होत आहे. जनतेने अश्या नेत्यांवर काय विश्वास ठेवायचा. नवी मुंबई पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला असला तरीही प्रेस नोट काढावा असे सांगितलं असल्याचंही गोऱ्हे यांनी सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.