केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात; मी बळीचा बकरा - प्रताप सरनाईक
केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात; मी बळीचा बकरा - प्रताप सरनाईकSaamTV

केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात; मी बळीचा बकरा - प्रताप सरनाईक

ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून मला कडून कसल्याही प्रकारचा त्रास दिला गेला नाही नसल्याचही सरनाईक यावेळी म्हणाले.

मुंबई : शिवसेनाShivsenaआमदार प्रताप सरनाईक आज पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले की 'केंद्राला असं वाटलं की प्रताप सरनाईक सगळ्यांच्या मागे लागलाय आणि त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मध्ये माझा मोठा बळीचा बकरा झाला आहे'.I got caught up in the center-state dispute

हे देखील पहा-

मागील काही दिवसांपासून आमदार प्रताप सरनाईकPratap sarnaik यांच्यावरती ईडीच्या चौकशीचाED Inquiry कारवाई सुरु आहे तसेच ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांकडून मला कडून कसल्याही प्रकारचा त्रास दिला गेला नाही नसल्याचही सरनाईक यावेळी म्हणाले. तसेच अधिकारी त्यांच काम करत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांची त्यांना उत्तर देतोय, शिवाय माझ्यावरील आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान विरोधकांकडून सेनेच्या किंवा महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांना अडचणीत आणलं जातय का भाजपमध्ये तुम्ही यावं यासाठी हा सर्व प्रयत्न सुरु आहे का असं विचारल असता' मी शिवसेनेमध्ये लहान कार्यकर्ता आहे आणि मी स्वत:च अडचणी मध्ये आहे त्या मुळे मी इतरांवर काय बोलणार असं वक्तव्य त्यांनी केलं.

केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात; मी बळीचा बकरा - प्रताप सरनाईक
बापरे! कोरोना RT-PCR टेस्टचे सर्टिफिकेट लॅबमधून नव्हे; सायबर कॅफेतून

दहीहंडी ऐवजी आरोग्य उत्सव साजरा करणार

काही आयोजक हे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उत्सव करत आहेत मात्र उत्सव दरवर्षी असतो मात्र लोकांचे जीव महत्वाचे आहे. गोविंदाच्या जीवाशी खेळू नका अशी सुचनाही सरनाईक यांनी विरोधकांना दिली. दहीहंडीDahihandi उत्सवामध्ये कोरोना नियमांचे पालन होणे अशक्य आहे सर्व गोविंदा एकमेकांना पकडून वरती मनेरा रजत असतात तसेच हंडी फोडणारे लहान मुलं असतात ज्यांचा अजून एकही डोसVaccination पुर्ण झालेला नाही. उत्सव दरवर्षी येणार असून आपण ते पुढेही साजरे करु मात्र आता आपण दहीहंडी ऐवजी आरोग्य उत्सव साजरा करणार असल्याचही सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com