Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसच्या जेवणात आढळली मानवी नखे; कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला ठोठावला २५ हजारांचा दंड

CSMT-Madgaon Vande Bharat Express: सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला हा दंड ठोठावण्यात आलाय.
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressSaam TV
Published On

Human Nail In Food: रेल्वेमधील जेवणाच्या कायमच अनेक तक्रारी समोर येतात. अशात वारंवार येणाऱ्या तक्रारींमुळे IRCTC कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला तब्बल २५,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला हा दंड ठोठावण्यात आलाय. दंड भरल्यानंतर तरी चांगले जेवण पुरवले जाईल अशी आशा प्रवाशांनी व्यक्त केली आहे. (Latest vande bharat express)

द टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या अधिकमाहितीनुसार, भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला २५,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका प्रवाशाने काही दिवसांपूर्वी जेवणात (Food) मानवी नखे सापडली होती. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करत त्या प्रवाशाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

Vande Bharat Express
Healthy Food: पोहे की भात? आरोग्यासाठी काय आहे अधिक फायदेशीर? जाणून घ्या

अनेक प्रवाशांनी या व्हिडिओवर कमेंटमध्ये आपला अनुभव देखील शेअर केला. मुंबई-गोवा ट्रेनमधील खराब सेवा आणि जेवणाच्या दर्जाबाबत अनेक प्रवाशांनी ट्वीटही केले आहे. आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेमधील प्रवाशांना चांगले जेवण पुरवले जात आहे की नाही हे पाहण्यासाठी एक टीम निवडण्यात आली. काही प्रोटोकॉल आखण्यात आले. यामध्ये एका ऑफिसरने ऑन-बोर्ड मॉनिटरिंगसाठी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. यावेळी IRCTC ने रत्नागिरी येथील बेस किचन पूर्ण तपासले.

२७ जून रोजी सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये (Vande Bharat Express) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डाळ फारच खराब लागली. तसेच आणखीन एका प्रवाशाला जेवणाच्या पाकिटात नखे सापडली. आयआरसीटीसीने केलेल्या कारवाईनुसार या पुढे प्रवाशांना चांगले जेवण मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Vande Bharat Express
Train Viral Video: बाळाला घट्ट मिठी मारून आईचा मृत्यूच्या वाटेवर प्रवास; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com