हनिमूनसाठी श्रीलंकेत, अचानक दोघांचा वाद; आधी बायकोने आयुष्य संपवलं, नंतर नवऱ्याचंही टोकाचं पाऊल

bengaluru couple ends life : श्रीलंकेत हनिमूनसाठी गेलेल्या कपलचं भांडण झालं. भांडणानंतर या जोडप्याने वेगवेगळ्या दिवशी आत्महत्या केली.
bengaluru news
bengaluru couple ends life Saam tv
Published On
Summary

बेंगळुरूमधून धक्कादायक घटना उघडकीस

भांडणानंतर नवरा आणि बायकोने आयुष्य संपवलं

नवऱ्याच्या आईने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

कर्नाटकातील बेंगळुरूमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या रात्रीच नवरा आणि बायकोचं कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर या जोडप्याने वेगवेगळ्या दिवशी आत्महत्या केली. या घटनेने बेंगळुरूमध्ये खळबळ उडाली आहे.

लग्नानंतर सूरज शिवन्ना आणि गानवी हनिमूनसाठी श्रीलंकेला गेले होते. श्रीलंकेत असताना दोघांचं एकमेकांशी कडाक्याचं भांडण झालं. श्रीलंकेवरून घरी परतल्यानंतर काही दिवसांनी गानवीने बेंगळुरू येथील राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

गानवीच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी नवऱ्याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. गानवीच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, '26 वर्षीय गानवीला घरी नेण्यासाठी आलो. त्यावेळी गानवीच्या सासरच्या लोकांनी अपमान केला. त्यांच्यामुळे लेकीने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

bengaluru news
धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

तक्रारीत नवरा आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी हुंड्यासाठी छळल्याचाही आरोप केला. त्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी करत गानवीच्या सासरच्या घरासमोर आंदोलन केलं. घरासमोर आंदोलन केल्यानंतर सूरजचे आई आणि वडील नागपूरला राहायला गेले. त्यानंतर शनिवारी सूरजने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली.

bengaluru news
अवघ्या ४ दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, चांदीही चकाकली; सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले?

सूरजने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने त्याच्या मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला. सूरजच्या आईने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सूरजच्या आईचा जीव वाचला. मात्र, त्याच्या आईची प्रकृती गंभीर असल्याचेही सांगण्यात येत आहे. तिची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.

bengaluru news
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार; वंचितसोबत चर्चा अंतिम टप्प्यात

सूरज शिवन्ना आणि गानवीचं लग्न २९ ऑक्टोबर रोजी झालं होतं. दोघांनी लग्नात सात जन्म एकत्र राहण्याचं वचन दिलं होतं. परंतु दोघांचं नातं अवघ्या दोन महिन्यात संपुष्टात आलं. या दोघांनी आत्महत्या केल्याने नातेवाईक आणि परिसरात लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com