रश्मी पुराणिक -
मुंबई : पोलीस सेवेतून निलंबित केलेल्या परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात अखिल भारतीय सेवा नियम अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. - Home Minister Dilip Walse Patil says disciplinary action against Parambir Singh started
तसेच, परमबीर सिगांसोबतच आणखी 28 अधिकार्यांविरोधात निलंबनाच्या कारवाईची शिफारस पोलीस महासंचालकांनी केली आहे. गृहमंत्री वळसे पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात याबाबतची माहिती दिली. मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावाबाबत अबू आझमी यांनी विधानसभेत लेखी प्रश्न विचारला होता त्याला गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.
हेही वाचा -
परमबीर सिंग यांच्यासह 30 पोलीस अधिकारी-कर्मचार्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचा निपक्षपातीपणे तपास करण्यासाठी त्यांना सेवेत ठेवणे योग्य नाही, त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी सरकारला दिला आहे. यामध्ये पाच पोलीस उपायुक्त आणि पाच सहायक आयुक्त दर्जाच्या पोलिसांचा समावेश आहे
याबाबत काय अनियमितता झाली याचा तपशील अहवाल गृह खात्याने मागवला आहे. अहवालानुसार परमबीर सिंग आणि पराग मणेरे यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
Edited By - Nupur Uppal
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.