Pen Drive Bomb: फडणवीसांच्या पेनड्राईव्ह आरोपांचा तपास CID करणार - गृहमंत्री

मुंबई पोलिसांवर फडणवीसांचा विश्वास नाही का, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
Dilip Walse Patil on Pend drive Bomb
Dilip Walse Patil on Pend drive BombSaam Tv News

रश्मी पुराणिक -

मुंबई : फडणवीसा पेन ड्राईव्ह प्रकरणी उत्तर देणार असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. त्यापार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी आज विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्ह केस प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केलीये, मुंबई पोलिसांवर फडणवीसांचा विश्वास नाही का, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसेच, या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार असंही त्यांनी सांगितलं (Home Minister Dilip Walse Patil Says CID will Investigate Devendra Fadnavis Pen Drive Allegations).

"जुन्या पोलिस ठाण्याच्या इमारतींचं बांधकाम हाती घेतलंय"

विरोधीपक्ष नेत्यांनी जास्तीत जास्त वेळ दोन प्रकरणांवर खर्च केला. राज्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती खालावली हे बरोबर नाही. महिला सरक्षण शक्ती विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी गेले आहे. त्यांची स्वाक्षरी झाली की एक चांगला कायदा राज्याला मिळेल. राज्यातील पोलीस ठाण्यांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. काही इमारती या ब्रिटीशकालीन आहेत. त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीकोणातून गृहनविभागाने निर्णय घेतला आणि गेल्या वर्षी 87 पोलीस ठाण्यांची बांधकामं हाती घेतली. त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच, निवासासंबंधीही मोठी तरतूद केली आहे.

राज्य राखीव दलातील पोलीस अंमलदार यांना पोलिसांत जाण्यासाठीची अट 15 वर्षांवरुन 12 वर्षांवर आणली आहे, जेणेकरुन त्यांना लवकर पोलिसांत जाता येईल. कोव्हिड काळात पोलिसांची चांगली कामगिरी केली. 394 पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

"138 विशेष जलदगती न्यायालयांची स्थापना"

राज्यात बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत प्रलंबितजी प्रकरणं आहेत ती निकाली काढण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयांची स्थापना करण्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी, 108 विशेष जलदगती आणि 30 पोक्सो अंतर्गत न्यायालय सुरु करण्यासंदर्भात निर्णय झालाय. यामध्ये 25 न्यायालयं कार्यान्वित झाले असल्याचही गृहमंत्र्यांनी सांगितलं.

पेपरफुटी प्रकरणी गुन्हे दाखल

पेपरफुटी प्रकरणी कठोर भूमिका घेतलीये. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही. एकूण पाच गुन्हे दाखल केले आहेत. आरोग्य विभाग भरती गट ड 20 आरोपींना अटक केलीये. अजून 10 बाकी, गट क भरती गुन्हा 11 आरोपी अटक 9 पाहिजे. म्हाडा गुन्हा दाखल केला, 6 आरोपी अटकेत, 16 बाकी. TET बाबत गुन्हा दाखल केला, 14 आरोपींना अटक केली. तपासात त्यांनी सांगितलं 2017 पासून हे सुरुये. ज्या कंपन्या नियुक्त करताना अधिक पारदर्शक पद्धत कशी राहिल यबाबत सगळ्यांशी चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ज्या पोलीस दलाचा अभिमान त्यावर फडणवीसांचा विश्वास नाही

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा उल्लेख केला. त्यावेळी त्यांनी मला पोलीस दलाचा अभिमान आहे, असं ते म्हणाले. त्याचं दलावर विश्वास न ठेवता प्रत्येक प्रकरण सीबीआय किंवा इतर एजन्सीकडे देण्याचा आग्रह धरणे बरोबर नाही. सरकार जर षयडंत्र करत असेल, गैरपावर करत असेल तर त्यासंदर्भात नक्की बोला. पण, गिरीष महाजनांसदर्भात जो आरोप केलाय त्याबाबत मी एक गोष्ट स्पष्ट करतो. १९९३ बॉम्बस्फोट, २००५-२००६-२००८ मध्ये हल्ले झाले. ३फेब्रुवारी २०२२ तक्रार दाखल झाली. ९३ बॉम्बस्फोट अनेकांना शिक्षा झाली.

Dilip Walse Patil on Pend drive Bomb
मराठा आरक्षणाला विरोध करणाराच 'एक मराठा लाख मराठा' म्हणतोय - गृहमंत्री

पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास करणार

स्टिंग ऑपरेशन झालं. 125 तासांचं फुटेज दिलं, मला माहितीये तुम्ही सर्व पेन ड्राईव्ह दिलेले नाहीत काही राखून ठेवले आहेत. जशी वेळ येईल तसे तुम्ही ते बाहेर काढाल. या घटनांमागे नेमकं कोण आहे याचा तपास करावा लागेल. या घटनेत कोण दोषी आहे, काय कारवाई करायची, हे पाहावं लागेल.

आपण एकदा मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांना पेन ड्राईव्ह दिला. मागच्या अधिवेशनात पेन ड्राईव्ह दिला. या अधिवेशनात दोन पेन ड्राईव्ह

आपण डिटेक्टीव्ह एजन्सी उघडलीये का, गृहमंत्री असं म्हणताच विधानसभेत एकच हशा पिकल

तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होता, तुम्ही तपास केला असता तर बरं झालं असतं. गुन्ह्यात अडकवलं जातं, परत आम्हाला म्हणता षडयंत्र करता पोलीस दलाचा वापर करता. जळगावमध्ये दुसरी केस घडली, पतसंस्था घोटाळा चौकशी केंद्रीय कृषी मंत्री राधा सिंह यांनी २०१८ साली आदेश दिला. यात २६ आरोपी पोलीस तपास करतात. आज वातावरण निर्माण केलं जातं, महाविकास आघाडी सरकारमागे लागून दोष देतात, फसवतात. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी तपास करायचा की नाही. काल घटना घडली. जर पोलिसांनी तपास करुन सत्य पुढे येत असेल. उद्या गिरीश महाजन निर्दोष झाले तर आज वातावरण निर्माण केलं जातं. आज आपण एक अजून पेन ड्राईव्ह दिले. डॉ. लांबे, आपली माहिती चुकीची आहे. या व्यक्तीची नेमणूक सरकारने केली नाही. ते निवडून आले आहेत.

नाना पटोले फोन टॅपिंग मुद्दा उपस्थित केला. अन्य आमदार यांनी मागणी केली. याची चौकशी करायचे सांगितले. या उच्चस्तरीय समितीला फोन टॅपिंग चौकशी करायचे आदेश दिले. अहवाल डील राज्य सरकारने स्वीकारला. त्यात २०१७-२०१८ मध्ये पुण्यात रश्मी शुक्लाच्या चार लोकप्रतिनिधीनी सहा फोन टॅप केले. एखादा वरिष्ठ अधिकारी असं काम करत असेल लोकप्रतिनिधी भाजप मधील आपल्याच पक्षातील लोकांवर पाळत ठेवून असेल. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केले. बेकायदेशीर फोन टॅपिंग केले. मुंबईत एसआयडी कमिश्नर असताना अशीच घटना घडली. या घटनेचा तपास करताना राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. त्यात गुन्हा दाखल करण्याबाबत माहिती घेत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

घटना काय अँटिलिया केस कोणीतरी जिलेटिन ठेवले. त्यातून मणसुख हिरेन खून झाला. केस एनआयएकडे गेली. अंबानींच्या घराखली जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचे कारण काय. NIA काय तपास केला माहिती नाही. ज्या पोलिसांनी चुकीची माहिती दिली, त्यांच्यावर कारवाई झाली. आधी १०० कोटी आरोप आता २५० कोटी आकडा गेला. एखादा अधिकारी मंत्र्यांवर आरोप करतो. ईडी, इन्कम टॅक्स रेड झाली. त्यांची केस एक सीबीआयकडे ,एनआयएकेड, एक ईडी ने रेड घातली. त्यांच्यावर ९० छापे टाकले. अडचणीत आणायचे तर यंत्रणा कशी वापरली जाते.

याचा नेता कोण सदावर्ते वकील. हे वकील कोण मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात गेलं त्या कोर्टात जयश्री पाटील या सदावर्तेंच्या पत्नी. हरीश साळवे सारखं वकील त्यांच्या मदतीलाज्यांनी आरक्षणाला विरोध केला, तो म्हणतो एक मराठा लाख मराठा. शरद पवार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदनामी करायची याच्या मागे कोण, कोण मदत करतं, पैसे कोण देत? ओबीसी आरक्षण सभागृहाने मदत केली. कायदा सुप्रीम कोर्टात टिकेल. धनगर आरक्षण एक शब्द कोणी बोलत नाही. आपण बारामती आंदोलन पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देऊ असा,शब्द दिला. पाच वर्ष काही घडलं नाही. अडचणी काय समजून घेतलं पाहिजे.

सूडबुद्धीने कारवाई कोणीच करू नये. अजित पवार म्हणाले कोणी नोटीस काढू नये कारवाई करू नये. महाराष्ट्रात एक सलोख्याचे वातावरण होत आज काहीतरी गोंधळ झाला आहे. केंद्रीय यंत्रणा करत असताना आपला प्रवक्ते जाहीर करतो. आज रेड होणार,अटक होणार मग तसं घडतं. त्यांचे प्रवक्ते म्हणून घोषणा करता, आता भीती वाटते. सीबीआय द्या नाही तर न्यायलाय जातो. एखादी तरी संस्था सुरक्षित ठेवू असंही गृहमंत्री म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com