मराठा आरक्षणाला विरोध करणाराच 'एक मराठा लाख मराठा' म्हणतोय - गृहमंत्री

मराठा आरक्षण दिल्यावरती जे या आरक्षणाविरोधात सुप्रीम कोर्टात गेले आणि आरक्षणाला चॅलेंज करणाऱ्या कोर्टात पीटीशन भरणाऱ्या महिला जयश्री पाटील या सदार्वतेंच्या पत्नी आहेत.
Maratha Reservation
Maratha ReservationSaam TV

मुंबई : आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी विधानसेभेत बोलताना अनेक विषयांवरती भाष्य केलं आहे. त्यांनी विरोधीपक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांवरती उत्तर देतानाच एसटी आंदोलनावरती देखील ते बोलले यावेळी त्यांनी वकील गुणरत्न सदावर्तेंवरती (Gunaratna Sadavarten) टीका केली आहे.

ते म्हणाले, ठरावामध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बोलले की एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन या सरकारमुळे सुरु झालं तर मराठा आरक्षण या सरकारमुळे गेलं, ओबीसीच आरक्षण देखील सरकारमुळे गेलं म्हणत आहेत. मात्र, एसटी संप झाला त्यांचा नेता वकील गुणरत्न सदावर्ते कोण आहेत तर ते मराठा आरक्षण (Maratha Reservation) दिल्यावरती जे या आरक्षणाविरोधात सुप्रीम कोर्टात गेले आणि आरक्षणाला चॅलेंज करणाऱ्या कोर्टात पीटीशन भरणाऱ्या महिला जयश्री पाटील या सदार्वतेंच्या पत्नी आहेत. आरक्षणाला विरोध करणाराच म्हणतो 'एक मराठा लाख मराठा' असा टोला त्यांनी लगावला.

केवळ पवारांच्या बदनामीसाठी -

Maratha Reservation
Breaking: 'पेनड्राईव्ह बॉम्ब' प्रकरणातील सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा राजीनामा; गृहमंत्र्यांची माहिती

तसंच हे केवळ शरद पवार, (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचं काम चालू मात्र, आरक्षणाविरोधात कारवाया करण्यामागे कोण आहे? पैसे कोण देतय? याची चौकशी करायला हवी ओबीसीबाबत माझं काही म्हणण नाही आपण मदत केली कायदा मंजूर केला खात्री आहे कायदा सर्व कोर्टात टीकेल असही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com