Mumbai-Pune Expressway News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक जाम!, सलग सुट्ट्यांमुळे वाहनांची गर्दी

मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
Mumbai-Pune Expressway Traffic Update
Mumbai-Pune Expressway Traffic UpdateSAAM TV

लोणावळा : सलग सुट्ट्यांमुळं नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असून, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (mumbai-pune expressway news) सकाळपासूनच मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहतूक संथगतीने सुरू आहे.

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Heavy Traffic On Mumbai-Pune Expressway) शनिवारी (ता. १३) सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

Mumbai-Pune Expressway Traffic Update
Mumbai Pune News : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली; रेल्वेची वाहतूक ठप्प

बोरघाटामध्ये (Borghat) वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक संथगतीने सुरू आहे. शनिवार, रविवार वीकेंड आणि त्याला जोडून स्वातंत्र्य दिन, पारशी नववर्ष दिन अशा सलग चार दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे अनेकांनी पर्यटनासाठी जाण्याचा प्लान केला आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळे लोणावळा आणि खंडाळ्यातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स फुल्ल झाले आहेत.

Mumbai-Pune Expressway Traffic Update
CNG | मुंबई, ठाण्यात सीएनजीचा तुटवडा, मुंबईकर निराश, पाहा सविस्तर बातमी

शनिवारी सकाळीच मोठ्या संख्येने पर्यटक घराबाहेर पडल्याने एक्स्प्रेस वेवर वाहतुकीचा प्रचंड ताण आला आहे. खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या सुमारे दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या.

दस्तुरी, अंडा पॉईंट, अमृतांजन पुलादरम्यान वाहनांच्या सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे येणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. जुन्या महामार्गावरील खंडाळा, मुनीर हॉटेल ते अपोलो गॅरेज दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या. त्यामुळे लोणावळामधील नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. दुसरीकडे लोणावळा ते आंबवणे मार्गावर भुशी, लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. या वाहतूक कोंडीमुळं पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com