आरोग्य भरती परीक्षा - पेपरफुटीत न्यासाचाही सहभाग स्पष्ट

आरोग्यभरती पेपरफुटी प्रकरणी आज पुण्याचे पोलीस कमिश्नर अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे.
आरोग्य भरती परीक्षा - पेपरफुटीत न्यासाचाही सहभाग स्पष्ट
आरोग्य भरती परीक्षा - पेपरफुटीत न्यासाचाही सहभाग स्पष्टSaam Tv
Published On

प्राची कुलकर्णी

पुणे : आरोग्यभरती पेपरफुटी प्रकरणी आज पुण्याचे पोलीस कमिश्नर अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात त्यांनी एक मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. यात त्यांनी, 'गट क च्या पेपर फूटी मागे न्यासा असल्याचं स्पष्ट केलं आहे. गट 'क' चा पेपर बडगीरे बोटले सह न्यासाने देखील फोडला आहे. तर ३१ ऑक्टोबरच्या पेपर लीकची माहिती आली त्यात आजपर्यंत १८ लोकांना ताब्यात घेतलं आहे.

आरोग्य भरती परीक्षा - पेपरफुटीत न्यासाचाही सहभाग स्पष्ट
Breaking: शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह

पुढे त्यांनी, MHADA बद्दल पेपर फुटण्याच्या आधीच आम्ही एका टोळीला अटक केली आहे, तसेच त्यानंतर TET बद्दल ऑफेन्स रेजिस्टर करण्यात आले. या परीक्षांबाबत आम्ही जवळजवळ २६ आरोपींना पकडले आहे, अशी माहिती दिली आहे.

त्यानंतर २४ ऑक्टोबरला आरोग्यभरतीच्या झालेल्या परीक्षेतही पेपरफुटी झाली होती. त्यात काल महेश बोटले, प्रशांत बडगीरे या दोघांना अटक केली आहे. तर, बोटले बडगीरे आणि न्यासा यांनी दोघांनीही पेपर फोडले असं अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं आहे. ३१ ऑक्टोबरला आरोग्य भरतीच्या झालेल्या परीक्षेत आतापर्यंत आरोग्य विभागाचे जॉईंट डायरेक्टर आणि बाकी दलालचा समावेश आहे असे त्यांनी सांगितले. आणि तसेच परीक्षेचं कॉन्ट्रॅक्ट दिलेली न्यासा कंपनीतील काही लोकांचा समावेश असलायची माहिती अमिताभ गुप्ता यांनी आज दिली आहे. गट ड प्रकरणी देखील न्यासाचं कनेक्शन आहे का याचा तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे देखील पहा-

पुढे ते म्हणाले यामध्ये असलेल्या दलालांचा शोध सुरु आहे. आत्तापर्यंत 26 आरोपी पकडले गेले आहेत. गट क ची पेपर फुटी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाने अखेर गट बाबत तक्रार केली होती. पोलिसांनी सांगितल्यावर दाखल केली तक्रार केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com