वडगाव नगरपंचायतीच्या 11 हजार बांधकामांवर पडणार हातोडा?

वडगाव मधील सुमारे 11 हजार बांधकामे अनधिकृत तसेच नगरसेवकांची देखील घरे अनधिकृत असल्याचा धक्कादायक खुलासा.
वडगाव नगरपंचायतीच्या 11 हजार बांधकामांवर पडणार हातोडा?
वडगाव नगरपंचायतीच्या 11 हजार बांधकामांवर पडणार हातोडा? SaamTvNews
Published On

मावळ : वडगाव येथील तब्बल 11 हजार बांधकामे अनधिकृत असल्याचा धक्कादायक खुलासा आता झाला आहे. वडगाव (Vadgaon) येथील जुना राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी प्रशासनाने वडगाव मधील नऊ हजार बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत. रस्ता (Road) रुंदीकरणासाठी अनधिकृत बांधकामे (Illegal Constructions) काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, वडगाव मावळ (Maval) मधील ऍड.धनंजय काटे यांच्या इमारतीला देखील नोटीस देऊन केवळ तेवीस एप्रिल पर्यंत ऍड.काटे यांना बांधकाम काढून टाकण्याचे आदेश वडगाव नगरपंचायतीने दिले आहेत. परंतु उर्वरित कोणत्याच बांधकामांना असे आदेश देण्यात आले नसल्याने राजकीय आकसापोटी हा आदेश देण्यात आले असल्याचा आरोप ऍड. धनंजय काटे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

हे देखील पहा :

वडगाव नगरपंचायतीने (Vadgaon Nagarpanchayat) एडवोकेट धनंजय काटे यांना नोटीस बजावल्या नंतर त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने काटे यांच्या बांधकाम पाडण्यावर सध्या स्थगिती दिली आहे. मात्र, वडगाव मधील इतर सुमारे 11 हजार बांधकामे ही अनधिकृत असल्याचा खुलासा माहिती अधिकारात झाला आहे. यात वडगाव नगरपंचायती मध्ये असणाऱ्या नगरसेवकांची देखील घरे अनधिकृत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कौन्सिल नगरपंचायत अँड इंडस्ट्रीयल टाऊनशीप ऍक्ट नुसार वडगाव नगरपंचायतीच्या नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी देखील ऍड. धनंजय काटे यांनी केली आहे. 

वडगाव नगरपंचायतीच्या 11 हजार बांधकामांवर पडणार हातोडा?
ऑनलाईन गेम्सचं व्यसन, ६० जणांचं संपलं जीवन!

प्रशासनाने कोणत्याही प्रकारे काटे यांना टार्गेट केलं नाही. काटे यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली होती त्यानुसार त्यांना माहिती दिली. बरीच बांधकामे जुनी असल्याने त्याबाबत नगरपंचायतीत त्याची नोंद नाही. त्याबाबतची कागदपत्रे नगरपंचायतीच्या कार्यालयात उपलब्ध नाही. जी माहिती उपलब्ध होती ती त्यांना दिली गेली आहे. काटे यांच्या बांधकामाची परवानगी सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. परंतु, त्यांनी त्या सादर केल्या नसल्याने त्यांना बांधकाम काढण्याचा आदेश देण्यात आला आहे. जुना राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी त्यांच्या बांधकामाचा अडथळा असल्याच पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलं असल्याने ते बांधकाम हटविण्यासाठी सांगण्यात आल्याचे वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com