ऑनलाईन गेम्सचं व्यसन, ६० जणांचं संपलं जीवन!

केवळ बिंगो रोलेटच्या गेम्समध्ये लाखो रुपये गमावल्यानं राज्यभरात 60 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय.
Bingo Roulette Game
Bingo Roulette Game SaamTVNews
Published On

नाशिक : बिंगो रोलेटसह (Bingo Roulette) अन्य ऑनलाईन गेम्सनं (Online Games) तरूणाईला विळखा घातला असून लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात या ऑनलाईन गेम्सचं व्यसनचं लागलंय. केवळ बिंगो रोलेटच्या व्यसनापायी आत्तापर्यंत 60 जणांचा बळी गेल्याची माहिती समोर येत असून हे ऑनलाईन गेम्स कधी बंद होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

हे देखील पहा :

बिंगो रोलेटसह अन्य ऑनलाईन गेम्सनं सध्या धुमाकूळ घातला असून आर्थिक आमिषापोटी तरुणाई या गेम्सच्या आहारी गेलीय. या ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल होत असल्यानं झटपट पैसे कमावण्याच्या नादात तरुणाई या ऑनलाईन गेम्सना बळी पडतेय. धक्कादायक बाब म्हणजे या गेम्समध्ये लाखो रुपये गमावल्यानं राज्यभरात 60 जणांनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. विशेष म्हणजे या ऑनलाईन गेम्सना शासनाची अधिकृत मान्यता नसली, तरी जुन्या कायद्यांच्या आधारे ठोस कारवाई करता येत नसल्यानं ऑनलाईन गेम्सचा धंदा बिनभोभाट सुरु आहे.

Bingo Roulette Game
Beed : लग्नाळू तरुणांना आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा सूत्रधार पकडला!

बिंगो रोलेटशी संबंधित राज्यभरात 17 गुन्हे दाखल असून हे गेम्स चालवणाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल आहेत. मात्र जुने कायदे हे केवळ जुगारासंदर्भातील गुन्ह्यांसाठी असल्यानं पोलीसी कारवाईला मर्यादा येतायत. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये कडक कारवाईसाठी दंड आणि शिक्षेत वाढ करण्याचा प्रस्ताव नाशिकच्या (Nashik) पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालकांना दिलाय. शिवाय अशा गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा अथवा मोक्काअंतर्गत कारवाईसाठी देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलीय.

Bingo Roulette Game
Pune : 'त्या' खून प्रकरणाचा लागला छडा; हत्या करून बावधनच्या नाल्यात फेकले होते प्रेत!

गेल्या काही वर्षांत ऑनलाईन गेम्सचा सुळसुळाट झाला असून कायद्यातील पळवाटांच्या आधारे ऑनलाईन गेम्स चालकांनी आपलं बस्तान बसवलंय. या गेम्सच्या माध्यमातून पैसे झटपट कमावण्याचं आमिष दाखवलं जात असल्यानं तरुणाईही (Youth) याला बळी पडतेय. त्यामुळे अशा गेम्सवर कठोर बंधनं लादण्याची गरज निर्माण झालीय. 

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com