Beed : लग्नाळू तरुणांना आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा सूत्रधार पकडला!

गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील एका 23 नवरदेवांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता.
Beed : लग्नाळू तरुणांना आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा सूत्रधार पकडला!
Beed : लग्नाळू तरुणांना आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा सूत्रधार पकडला!SaamTvNews
Published On

बीड : लग्नाळू तरुणांना आमिष दाखवून लग्नाच्या बहाण्याने लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पकडण्यात बीडच्या गेवराई पोलिसांना यश आले आहे. गेवराई (Georai) तालुक्यातील तळणेवाडी येथील एका 23 तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता. अश्याच प्रकारची फसवणूक विवाहित तरुणाची झाली होती. लग्नाच्या 8 दिवसानंतर नवरी (Bride) मुलगी निघून गेली ती परत आलीच नाही. पीडित नवरदेव (Bridegroom) तरुणाच्या फिर्यादीवरून नवरी मुलीसह पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील मुख्य सूत्रधार रामकिसन जगन्नाथ तापडीया याला पोलिसांनी अटक केलीय.

हे देखील पहा :

गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील कृष्णा अशोक फरताळे या मुलाला आरोपी रामकिसन जगन्नाथ तापडीया ( रा. सालवडगाव ता. शेवगाव जि.अहमदनगर ) या व्यक्तीने औरंगाबाद (Aurangabad) येथील एका मुलीचे स्थळ आणले होते. दरम्यान, नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चार जणांनी दोन लाख देत असाल तर लग्नास सहमती दर्शविली होती. त्यानुसार नवरीकडील मंडळींना रोख 60 हजार व 1 लाख 40 हजाराचा धनादेश दिला होता.

Beed : लग्नाळू तरुणांना आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा सूत्रधार पकडला!
Pune : 'त्या' खून प्रकरणाचा लागला छडा; हत्या करून बावधनच्या नाल्यात फेकले होते प्रेत!

गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगाव फाट्यावरील एका मंगल कार्यालयात दि. 20 जुलै 2021 रोजी लग्न समारंभ (Marriage) पार पडला. दरम्यान दिलेला धनादेश 8 दिवसांत वठताच, नवरी मुलगी रेखा हि माहेरी जाते म्हणून गेली. यानंतर वेळोवेळी वेगवेगळे कारणे देत ती परत आलीच नाही. यानंतर काही दिवसांनी तिचा मोबाईल (Mobile) बंद झाला. तर तिचा आठ वर्षापूर्वी काकासाहेब भाऊसाहेब पठाडे या व्यक्तीशी विवाह झाला असून त्यांना दोन अपत्य देखील असल्याचे नवरदेव मंडळींना कळताच त्यांना धक्काच बसला.

Beed : लग्नाळू तरुणांना आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा सूत्रधार पकडला!
महाराष्ट्र पोलिसांचा मला सार्थ अभिमान - सुप्रिया सुळे

त्यामुळे आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचे स्थळ आणलेले रामकिसन जगन्नाथ तापडीया फसवणूक केल्याचे समोर आले होते. त्यामुळं आता मुख्य महोरक्याला अटक केल्यानं, लग्न आणि धोका यात आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे? हे समोर येणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com