सोलापूर : ऑपरेशन परिवर्तन (Operation Parivartan) उपक्रम कौतुकास्पद असून महाराष्ट्र पोलिसांचा मला सार्थ अभिमान असल्याचे मनोगत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले. खासदार सुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तनच्या उपक्रमाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. सोलापूर (Solapur) ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Tejasvi Satpute) यांनी हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे. सोलापुरातील मुळेगाव तांडा येथे हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
हे देखील पहा :
या उपक्रमाला त्यांनी भेट तर दिलीच मात्र या उपक्रमाचे सुळेंनी लोकसभेतही कौतुक केले होते. या उपक्रमानुसार हातभट्टी दारू तयार करणाऱ्या महिलांच्या हातात शिलाई मशीन आले आहे. यासह विविध बदल या महिलांच्या जीवनात आले आहेत, ते स्वागतार्ह असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या उपक्रमाचे कौतुक करताना पोलिसांनाही (Police) त्यांनी एकप्रकारचे बळ देत त्यांचेही कौतुक केले. कोणत्याही लोकप्रतिनिधीचा त्याच्या धोरणामुळे परिवर्तन होत असेल तर निश्चितच ते आनंददायी असते, असे या उपक्रमाचे कौतुक करताना सुळे यांनी म्हटले आहे.
जिथे जिथे चांगली कामे होतात, त्याची आपण नोंद घेतली पाहिजे. त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. मला महाराष्ट्र पोलिसांचा सार्थ अभिमान असून राज्यभरात कुठेही फिरताना मला अजिबात भीती वाटत नाही. कारण राज्यात जबाबदार पोलीस आहेत आणि त्यांच्यातर्फेच आज हा उपक्रम राबविला गेला असून तो अतिशय कौतुकास्पद आहे. हा विषय गृह आणि टेक्सटाइल या विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांना तसेच टेक्सटाइल मंत्र्यांनाही याविषयी पत्र लिहिणार असून याविषयीची माहिती त्यांना देणार असल्याचे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.