Breaking: डोंबिवली नागरी सहकारी बँकेवर हॅकर्सचा डल्ला, कोट्यावधींची फसवणूक

डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर हॅक करून कोट्यावधींची रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.
Dombivli Citizens Co-operative Bank
Dombivli Citizens Co-operative Bankप्रदीप भणगे
Published On

डोंबिवली : डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा (Dombivli civic co-operative bank) सर्व्हर हॅक करून तब्बल १ कोटी ५१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. हा प्रकार बँकेच्या निदर्शनास येताच संगणक विभाग प्रमुख राईलकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) तक्रार करण्यात आलीय.

शनिवारी एका हॅकरने डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर असलेल्या नवी मुंबई महापे येथील सर्व्हर कक्षात Online पद्धतीने संपर्क केला. त्याने बँकेचे खाते हॅक करून किंवा बँकेच्या विदेमध्ये (डेटा) मध्ये फेरफार करून बँकेची सुमारे १ कोटी ५१ लाख रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. हा प्रकार बँकेच्या निदर्शनास येताच संगणक विभाग प्रमुख राईलकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात 185/2022 भा.द.वि. कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Dombivli Citizens Co-operative Bank
'गांधी परिवार काँग्रेसचं ह्रदय, त्यांच्याबद्धल अपप्रचार करणाऱ्यांना किंमत नाही'

दरम्यान, डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याने अज्ञात इसमांनी सुमारे १.५० कोटींची फसवणूक केली असून. सायबर हल्लेखोराचा १० कोटींहून अधिक रक्कमेचा अपहार करण्याचा प्रयत्न होता. परंतू IT विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने सर्व्हर बंद केल्याने अधिक फसवणूक टाळता आली आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा नोंदवला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.यामुळे कोणत्याही ग्राहकांच्या ठेवींचे नुकसान झालेले नाही. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून अन्य सर्व ठेवी सुरक्षित आहेत.

ज्या बँकांच्या खात्यात ही रक्कम वळवण्यात आली आहे, त्या सर्व बँकांना याबाबत अवगत केले असून, त्या बँकांकडून पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या बँकांचे सहकार्य मिळत आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अॅड. गणेश धारगळकर यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com