मावळ : गुढीपाडवा(Gudhi Padwa) व हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त मावळ मध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या या भव्य शोभायात्रेत शेकडो दुचाकी वाहनांवरून हिंदू बांधव, महिला व अबाल वृद्ध सहभागी झाले होते. लोणावळ्यातील (Lonavla) पुरंदरे ग्राऊंड येथे सकाळी अकर वाजता प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीला सुरुवात झाली.
हे देखील पहा :
रॅलीच्या पुढे प्रभू रामचंद्राची प्रतिकृति असलेला रथ, त्याचप्रमाणे अयोध्या येथील राममंदिराची प्रतिकृति उभारण्यात आली होती. त्यामागे महिला, युवक व पुरुष रॅलीमध्ये आपल्या वाहनांना हिंदू ध्वज लाऊन सहभागी झाले होते. प्रत्येकांच्या डोक्यावर भगवा फेटा अशा या अभूतपूर्व रॅलीमुळे लोणावळा शहर व ग्रामीण परिसर भगवामय झाला होता. जागोजागी नागरिकांनी रॅलीवर फुलांची उधळण व फटाक्यांची आतीषबाजी केली. चैत्र पाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी लंकेवर विजय मिळवून ते अयोध्येत दाखल झाले. तेव्हापासून तमाम हिंदू (Hindu) बांधव हा दिवस घरावर गुढया उभारून विजयदिन म्हणून साजरा करतात.
तसेच गुढी पाडव्याच्या दिवशी संवत्सर बदलते व हिंदू नववर्षाची सुरुवात होते. म्हणून हा दिवस लोणावळा शहर व परिसरात हिंदू समितीच्या वतीने मोठया उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान वडगाव मावळ मध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. विशेष म्हणजे या मिरवणूकीमध्ये गोपाळराव देशपांडे, नवजीवन केंद्र,वसतिगृहाचे शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.