Actor Govinda : अभिनेता गोविंदा लोकसभेच्या रिंगणात? शिंदे गटात करणार प्रवेश?

Actor Govinda Latest News : लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेता गोविंदा यांचं नाव चर्चेत आहे. या उमेदवारीसाठी अभिनेता गोविंदा लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Govinda
GovindaSaamtv
Published On

Actor Govinda News :

लोकसभा निवणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काही राजकीय पक्ष लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रबळ दावेदार शोधत आहेत. शिंदे गटानेही उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रबळ उमेदवार शोधण्याची तयारी सुरु केली आहे. या लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेता गोविंदा यांचं नाव चर्चेत आहे. या उमेदवारीसाठी अभिनेता गोविंदा लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या शर्यतीत अभिनेता गोविंदा नाव आहे. अभिनेता गोविंदा आहुजा यांचं नाव उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी चर्चेत आहे. गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी या अनुषंगाने अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Govinda
Arvind Kejriwal : केजरीवालांना तुरुंगातून दिल्लीचं सरकार चालवता येणार का? कायदा काय सांगतो? जाणून घ्या

महाविकास विकास आघाडीकडून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांचं वय लक्षात घेता त्यांच्या जागी इतर उमेदवारांची चाचपणी पक्षाकडून सुरु आहे.

Govinda
Pune Politics : 'मी कोणाच्याही चपला उचलणार नाही', रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा बागुल आक्रमक

गोविंदा हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. तसेच त्यांना राजकीय डावपेच याचीही जाण असल्याने अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गोविंदा यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी देखील सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Govinda
Arvind Kejariwal Arrest ED : मुख्यमंत्र्यांपासून राज्यसभा खासदारांपर्यंत... कोण आहेत दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक झालेले १६ जण?

दरम्यान, या लोकसभा मतदारसंघासाठी अक्षय कुमार,माधुरी दीक्षित, नाना पाटेकर यांनाही विचारणा केल्याची माहिती मिळत आहे. या उमेदवारीसाठी अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांनी स्पष्ट नकार दिला. तर माधुरी दीक्षित यांच्याकडून उत्तरच आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com